गणेशोत्सवात डीजे लावण्यास पुणेकरांचा विरोध, गुडलक चौकात निदर्शने

गणेशोत्सवात डीजे लावण्यास पुणेकरांचा विरोध, गुडलक चौकात निदर्शने
Share

पुणे- गणेशोत्सवादरम्यान कानाचे पडदे फाडणाऱ्या आवाजातील लाऊडस्पीकर्सच्या वापराचा निषेध करण्यासाठी रविवारी गुडलक चौकात कलाकार कट्ट्यावर मोठ्या संख्येने पुणेकर एकत्र आले. ‘जबाबदार नागरिक’ या भावनेतून आयोजित या मोहिमेत सण किंवा सांस्कृतिक उत्सवांच्या विरोधात नसून केवळ अति-आवाजाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या आंदोलनात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. त्यांनी हातात फलक घेऊन आयोजकांना जबाबदारीने उत्सव साजरा करण्याचे आणि आवाजाच्या मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन केले. “कानठळ्या बसवणारे लाऊडस्पीकर्स नकोत” आणि “आपला उत्सव, आपली जबाबदारी” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

गणेशोत्सवाचा मूळ उत्साह आणि आनंद जपतानाच, उत्सवामुळे स्थानिक रहिवाशांना—विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना—कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन सहभागी नागरिकांनी केले.

Vedh News