ब्रेकिंग न्यूज

खड्ड्यातील पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू , पुण्यातील दिघी गावातील घटना

पिंपरी- शाळेच्या मागे पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून एका १५ वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दिघीमधील मॅगझीन चौकाजवळ घडली. आश्वेत अनिल भोसले (वय १५ रा. संत गजानन महाराज नगर, दिघी ) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. आश्वेत हा दिघी येथील रामचंद्र गायकवाड शाळेमध्ये इयत्ता ९ वीत शिकत होता. घटनेची…

Read More

एसटी प्रवासातील NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; राज्य सरकारचा निर्णय

‎मुंबई- राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मिळणाऱ्या सवलतींसाठी NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी) स्मार्ट कार्ड १ ऑगस्टपासून अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, लाखो पात्र प्रवाशांना अद्याप हे कार्ड मिळाले नसल्याने, गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही…

Read More

अल्पवयीन आरोपीची धिंड काढल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली

पुणे- हत्या प्रकरणातील अल्पवयीन संशयित आरोपींना पोलिसांच्या गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात त्यांची धिंड काढणे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना खूप महागात गेले आहे. या प्रकरणी मानसिंग पाटील यांची तडकाफडकी विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीला पोलिसांच्या गाडीच्या बॉनेटला…

Read More

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार तीन दिवसीय पिंपरी-चिंचवड महोत्सव

पिंपरी- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा तीन दिवसीय महोत्सव पार पडणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पिंपरी-चिंचवड शहरातील सांस्कृतिक चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देणे, स्थानिक कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून…

Read More

साखर आणि गुळाच्या दरात मोठी घसरण ; सर्वसामान्यांना दिलासा

पुणे- सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने परदेशातून शुल्कमुक्त साखर आयात करण्यास परवानगी दिली असून, त्यामुळे साखर व गुळाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता घाऊक बाजारात साखर आणि गुळाच्या दरात घसरण झाली आहे. ऊस उत्पादनात अपेक्षेपेक्षा झालेली मोठी घट आणि सणासुदीपूर्वी वाढलेली मागणी यामुळे देशात साखरेचे…

Read More

स्व. अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

पिंपरी- : नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने स्व. अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेमुळे परिसरातील क्रीडाप्रेमींना दर्जेदार सामने पाहण्याची संधी मिळाली, तर स्थानिक खेळाडूंना आपली कौशल्ये दाखवण्याचे तसेच पुढील स्पर्धांसाठी आत्मविश्वास वाढवण्याचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. स्पर्धेत विविध…

Read More

ऐनवेळी पोलीस आले आणि खंडणीचा डाव उधळला, तरुणींसह तिघांना अटक

शिक्रापूर- इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर प्रेमाचे नाटक करून तरुणाला भेटायला बोलावले. त्यानंतर त्याला डांबून त्याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करून एका तरुणीसहित तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शीतल संजय डाके, वैष्णवी आकाश गायकवाड, आकाश चिंतामण गायकवाड आणि शुभम कांडगे अशी…

Read More

कृषिपंपाच्या तांब्याच्या केबल चोरणारा सराईत गजाआड, १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

दौंड- कृषिपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या केबल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला यवत पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मनोज गुलाब बिद (वय ३७ वर्षे, मूळ राहणार उत्तर प्रदेश, सध्या मांजरी फार्म, ता. हवेली) असे या चोरट्याचे नाव आहे. ग्रामीण भागात शेतातील विहिरी किंवा विंधन विहिरींवर…

Read More

मुंबईत मोठी दुर्घटना; क्रेन कोसळून ८ ते १० जण जखमी 

मुंबई – क्रेनच्या साहाय्याने जेसीबी मशीन उचलताना जेसीबी सहित क्रेन कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत ८ ते १० जण जखमी झाले. मुंबईतील कुर्ला परिसरात आज पहाटे २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार क्रेनने जेसीबी शिफ्ट करत असताना हा परिसर रिकामा करण्यात आला होता, त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. परंतु या घटनेत ८…

Read More

मोशी प्राधिकरणात पर्यावरणपुरक दीपोत्सव साजरा

मोशी (वेध न्यूज )  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित मोशी प्राधिकरण मधील संतनगर मित्रमंडळ, भूगोल फाउंडेशन, इंद्रायणी सेवा संघ व परिसरातील पर्यावरण प्रेमी ,संस्था तसेच इंद्रायणीनगर , संतनगर परिसरातील नागरीक यांच्या सहकार्याने एक दीप पर्यावरणासाठी या उपक्रमाअंतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आला. मोशी प्राधिकरणातील एम आय डी सी पोलीस स्टेशन शेजारील डिस्ट्रिक्ट सेंटर सर्कल येथे पर्यावरणाचा संदेश देत  हजारो…

Read More