ब्रेकिंग न्यूज

मुंबईत मोठी दुर्घटना; क्रेन कोसळून ८ ते १० जण जखमी 

Share

मुंबई – क्रेनच्या साहाय्याने जेसीबी मशीन उचलताना जेसीबी सहित क्रेन कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत ८ ते १० जण जखमी झाले. मुंबईतील कुर्ला परिसरात आज पहाटे २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार क्रेनने जेसीबी शिफ्ट करत असताना हा परिसर रिकामा करण्यात आला होता, त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. परंतु या घटनेत ८ ते १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही.

ही क्रेन कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यान ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) लाईनवर कोसळली. या रेल्वे लाईनचा वापर प्रामुख्याने मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो.

त्यामुळे सामान्य लोकल किंवा प्रवासी ट्रेन सेवांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.