ब्रेकिंग न्यूज

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत – संदीप बेलसरे

पिंपरी, पुणे,- आखाती देशातील इराण – इस्राईल, अमेरिका या देशातील युद्धाचा प्रत्यक्ष फटका हा आपल्या भारत देशातील उद्योगांवर झाला आहे. त्यात कच्च्या मालाची किंमत वाढणे, आपला निर्यातक्षम पक्का व कच्चा माल तसाच बंदरामध्ये पडून राहणे आयात होणाऱ्या मालामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास अशा धातूंचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे. या युद्धामुळे उद्योजक संकटात,…

Read More

मुंबईतील चेंबूर भागात टँकरमधून गॅस गळती, नागरिकांना श्वास घेण्यास त्रास

मुंबई- मुंबईतील चेंबूर परिसरातील म्हैसूर कॉलनी आणि वाशीनाका भागात मोनोरेल स्टेशनजवळ एका केमिकल टँकरमधून बेंझीन (Benzene) या घातक रसायनाची गळती झाल्याची घटना ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री घडली. या गळतीमुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास आणि डोळ्यांची जळजळ जाणवू लागल्यामुळे घबराट पसरली. प्राथमिक माहितीनुसार, टँकर क्रमांक GJ 05 CU 9629 च्या बॉटम वाल्व्हमधून (Bottom valve)…

Read More

शंकर (आण्णा) गावडे यांचा २२ वा स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात साजरा

पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे दिवंगत अध्यक्ष शंकर (आण्णा) गावडे यांच्या २२ वा स्मृतिदिनानिमित्त महासंघाचे पदाधिकारी महापालिका कर्मचाऱ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी शंकर (आण्णा) गावडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजूर्डे यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी, सभासद, महानगरपालिका कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. शंकर…

Read More

डॉ . सुलक्षणा शिलवंत समाजाभिमुख सुशिक्षित नेतृत्व – भाऊसाहेब डोळस

पिंपरी (वेध न्यूज) पिंपरी चिंचवड शहरातील बौद्ध, मागास दुर्बल घटकाला समाजाभिमुख सुशिक्षित तसेच दृष्टे नेतृत्व हवे आहे असे मत बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस यांनी व्यक्त केले. बौद्ध समाज विकास महासंघाच्या वतीने आज पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला….

Read More

केंद्रीय विहार सोसायटी मध्ये बालगोपालांची रामलीला संपन्न

पिंपरी- लहान मुलांना मोबाईल पासून दूर करण्यासाठी आणि आपली कला, संस्कृती समजण्यासाठी त्यांनी सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमात सहभागी होण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे. तसेच त्यांच्यामध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे असे मत मोशी प्राधिकरण येथील केंद्रीय विहार सोसायटीचे सचिव मुकुंद पवार यांनी व्यक्त केले.     रामनवमी निमित्त मोशी, प्राधिकरण…

Read More

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी ; या तारखेला महामार्ग बंद राहणार 

मुंबई – समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या दरोडेखोरांनी प्रवाशांना लुटण्याची घटना घडल्यानंतर ‘एमएसआरडीसी’ने या महामार्गांवर सी सी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी दि. १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या दरम्यान दोन टप्प्यात महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.  २७ ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गावर मध्यरात्री सुमारे दीड तासाच्या कालावधीत तीन कुटुंबांना धाक दाखवून लुटण्यात आल्याची…

Read More

रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून २० कोटींचा अपहार, तीन महिलांसह पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल

शिरूर – बेकायदेशीरपणे भिशी चालवून, दाम दुप्पट रक्कम करून देण्याचे अमीष दाखवत जवळपास ३९ जणांकडून वीस कोटींहून अधिक रक्कम जमा करून त्या रकमेचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन महिलांसह पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तिघांना अटक केली आहे. हा प्रकार २०२० ते २०२५ च्या दरम्यान कारेगाव (ता. शिरूर) येथे घडला आहे….

Read More

सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल परमिट रूम आणि बार बंद

पिंपरी, पुणे – राज्य सरकारने मद्य विक्रेत्यांवर अन्यायकारकपणे करवाढ लादली आहे. यामध्ये मूल्यवर्धित कर पाच टक्क्यांवरून दहा टक्के, वार्षिक परवाना शुल्क मध्ये १५ टक्के आणि उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्के वाढ करण्यात आली आहे. या वर्षभरात ही तिसऱ्यांदा करवाढ केली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडतील आणि इच्छा नसताना देखील त्यांना…

Read More

विद्यार्थ्यांनो..पुणे महापालिका तुम्हाला देणार २५ हजार रुपयांची स्कॉलरशीप, त्यासाठी असा अर्ज करा 

पुणे महापालिका हद्दीतील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दहावीसाठी मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजना आणि बारावीच्या विद्यार्थांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना अनुक्रमे १५ हजार, तर बारावीसाठी २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येते. या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १७ ऑगस्टपासून सुरू होणार असून, ३१…

Read More

ज्येष्ठ नागरिकाने केली गंमत आणि मुंबई विमानतळावर निर्माण झाले तणावाचे वातावरण, काय घडले नेमके ?

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर एका प्रवाशाने सुरक्षा कर्मचाऱ्यांसमोर बॅगेत स्फोटक असल्याचे सांगितल्याने विमानतळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने तातडीने पावले उचलत संबंधित प्रवाशाला अटक करून तपासणी केली असता त्याने केलेला दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले. अनुज जयराम सुवर्णा (वय ५५) असे या प्रवाशाचे नाव आहे. ही घटना सकाळच्या…

Read More