पुणे रेल्वे स्टेशनवर लूटमार, रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला करून ५ लाखांचा ऐवज लुटला
पुणे- पुणे रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीजवळ एका रेल्वे कर्मचाऱ्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी चाकूने वार करून, हात-पाय बांधून व तोंडात रुमाल कोंबून रोख रक्कम, सोन्याची साखळी व दोन मोबाईल असा एकूण ४,९१,६२५ रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १८) मध्यरात्री १ च्या सुमारास घडली. केल्विन सोलोमन मायला (वय २९, रा. धायरकर कॉलोनी मुंढवा…
