लेझर, बीम लाईट वापरल्याप्रकरणी पहिला गुन्हा! सांगवीच्या गणेश मंडळाच्या अध्यक्षाला १००० रु दंड आणि कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा
पिंपरी – गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंदी घातलेल्या प्रखर लेझर आणि बीम लाईटचा वापर केल्या प्रकरणी सांगवी येथील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बजरंग विनायक लकडे (वय ३४, रा. आदर्शनगर, पिंपळे निलख) असे शिक्षा सुनावलेल्या मंडळाच्या अध्यक्षाचे नाव आहे. पिंपळे निलख येथील जय भवानी मित्र मंडळाचा…
