ब्रेकिंग न्यूज

आजपासून सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढला ! LPG गॅस, रिक्षा भाडे, दूध महागले, देशात होणार ५ मोठे बदल

Share

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात अनेक मोठे आर्थिक आणि व्यावहारिक बदल होत असतात. आगामी १ सप्टेंबर २०२६ पासून देशात ५ मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि बजेटवर होणार आहे. यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरांपासून ते विमानतळावरील इमिग्रेशन नियमांपर्यंतच्या बदलांचा समावेश आहे. १ सप्टेंबरपासून नेमके काय बदलणार आहे ते बघूया.

१. LPG सिलेंडरचे नवीन दर आणि e-KYC ची मुदत
दर महिन्याच्या १ तारखेला ऑइल मार्केटिंग कंपन्या गॅस सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात. त्यानुसार १ सप्टेंबरला घरगुती (१४.२ किलो) आणि व्यावसायिक (१९ किलो) सिलेंडरचे नवीन दर जाहीर केले जातील. दरम्यान, गॅस ग्राहकांसाठी आधार बायोमेट्रिक e-KYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. केवायसी न केल्यास १ सप्टेंबरपासून गॅस पुरवठा खंडित होऊ शकतो किंवा सबसिडी मिळण्यात अडचण येऊ शकते.

२. दूध महागले

घाऊक बाजारात म्हशीचे सुटे दूध आता १०२ रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. किरकोळ बाजारात (रिटेलमध्ये) ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत हा दर ११० ते ११५ रुपये प्रतिलिटर होण्याची शक्यता आहे.

३. रिक्षा टॅक्सी भाडेवाढ

किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये झाले आहे (१ रुपयाने वाढ). प्रति किलोमीटर दर १७.१४ रुपयांवरून १८.२२ रुपये झाला आहे. टॅक्सीचे किमान भाडे (पहिल्या १.५ किमीसाठी) ३१ रुपयांवरून ३३ रुपये झाले आहे (२ रुपयाने वाढ). प्रति किलोमीटर दर २०.६६ रुपयांवरून २१.९० रुपये झाला आहे

४. विमानतळावर ‘नो स्टॅम्पिंग’ नियम; वेळ वाचणार

आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी १ सप्टेंबरपासून एक दिलासादायक बदल होत आहे. आता आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष भौतिक शिक्का (Physical Stamp) मारण्याची गरज भासणार नाही. प्रवाशांना डिजिटल बनवण्यासाठी आणि विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी हा ‘नो स्टॅम्पिंग’ नियम लागू केला जात आहे.

५. आयटीआर (ITR) फायलिंग आणि लेट फी चा फटका

ज्या करदात्यांनी अद्याप आपला आयकर परतावा (ITR) भरलेला नाही किंवा त्यात सुधारणा करायची आहे, त्यांच्यासाठी ३१ ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे. जर तुम्ही १ सप्टेंबर किंवा त्यानंतर आयटीआर फाईल केला, तर आयकर विभागाच्या नियमांनुसार तुम्हाला ५,००० रुपयांपर्यंतचा दंड (Late Fee) भरावा लागू शकतो.

६. बँकिंग व्यवहारांचे नियम आणि शुल्क

१ सप्टेंबरपासून काही बँकांचे सेवा शुल्क बदलण्याची शक्यता आहे. विशेषतः कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर, पुढील प्रत्येक कॅश विड्रॉवलवर २३ रुपये अधिक जीएसटी (GST) शुल्क आकारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या मर्यादेतच व्यवहार करणे फायद्याचे ठरेल.

७. नवीन कार खरेदी महागणार?

ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाढत्या इनपुट खर्चामुळे (कच्चा माल महागल्यामुळे) काही मोठ्या वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या ठराविक मॉडेल्सच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार १ सप्टेंबरपासून काही कार खरेदी करणे महाग होऊ शकते.