ब्रेकिंग न्यूज

सुरक्षारक्षकाच्या मृत्यूप्रकरणी पोदार शाळेच्या प्राचार्यासह शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हा

Share

पिंपरी- ताथवडे येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्य प्रवेशद्वाराचा लोखंडी गेट अंगावर पडून सुरक्षारक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पुढील तपासानंतर पोलिसांनी प्राचार्य आणि शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची माहिती अशी की सुरक्षारक्षक संजय नागनाथ कांबळे, (रा. अशोकनगर, ताथवडे) हे गेट ३१ जुलै रोजी सकाळी सुमारे ८ वाजता उघडत असताना त्यांच्या अंगावर कोसळले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना २ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांना आढळून आले की लोखंडी मुख्य प्रवेशद्वाराची वेळोवेळी दुरुस्ती आणि योग्य देखभाल न केल्यामुळे कमकुवत झाले होते.

त्यानंतर पोलिसांनी पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य, शाळा प्रशासन तसेच गेटच्या सुरक्षिततेची आणि देखभालीची जबाबदारी असलेल्या संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू पांढरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.