रोहित पवारांच्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील ७ पैकी तिघांचे उपोषण मागे.. कारण काय ?
पुणे- पुण्यात एस.एम. जोशी पुलावर सुरु असलेल्या एमपीएससी आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. त्यातच आता महत्वाची बातमी समोर आली आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात उपोषण करणाऱ्या सात पैकी तिघांनी मध्यरात्री उपोषण सोडले आहे. जाणून घेऊ त्यांच्या उपोषण सोडण्यामागील कारण समोर आले आहे.
एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पुण्यातील आंदोलनात गेल्या काही दिवसांपासून काही विद्यार्थी बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. उपोषण करणाऱ्या सात पैकी तिघांनी मध्यरात्री उपोषण सोडले आहे. ऋषिकेश गांगर्डे, सोमनाथ चव्हाण आणि गजानन शेळके अशी उपोषण सोडणाऱ्यांची नावे आहेत. उपोषणामुळे तिघांच्या किडनीवर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाल्याने तिघांनी उपोषण सोडल्याचे सांगण्यात आले. इतर चौघांचे उपोषण मात्र सुरू राहणार आहे. विराज शिंदे या चिमुकल्याच्या काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्याहस्ते दूध घेऊन त्यांनी उपोषणाची सांगता केली.
“पण MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भीमनवार यांची विकेट घेतल्याशिवाय आंदोलनाची सांगता होणार नाही, हा सर्वांचा निर्धार मात्र कायम आहे ” असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, एस. एम. जोशी पूल, पत्रकार भवनाजवळ सुरू असलेल्या धरणे आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच आंदोलनस्थळ तात्काळ रिकामे करण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले आहेत. आंदोलकांनी पर्यायी ठिकाणी आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
#MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात सुरु असलेल्या #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहामध्ये काही विद्यार्थी हे उपोषणाला बसले आहेत. त्यातील काहींची तब्येत खालावल्याने आणि आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ज्येष्ठ मंडळींच्या आवाहनानुसार सोमनाथ चव्हाण, ऋषिकेश गांगुर्डे आणि गजानन शेळके यांनी उपोषण सोडले. विराज शिंदे या चिमुकल्याच्या आणि आ. विश्वजित जी कदम यांच्याहस्ते दूध घेऊन त्यांनी उपोषणाची सांगता केली पण #MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांची विकेट घेतल्याशिवाय आंदोलनाची सांगता होणार नाही, हा सर्वांचा निर्धार मात्र कायम आहे..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #PuneProtest
#भिमनवारांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे #MPSCStudentsProtest— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 9, 2026
