ब्रेकिंग न्यूज

कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली- कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा किंवा मानवी तस्करीचा गुन्हा (FIR) दाखल केलाच पाहिजे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याची अंमलबजावणी न करणाऱ्यांना राज्यांच्या गृह सचिव, पोलीस महासंचालकांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात दररोज अनेक व्यक्ती बेपत्ता होतात. विशेषतः अल्पवयीन मुले गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे….

Read More

कंटेनरने तीन वाहनांना दिली भीषण धडक ; खासदार निलेश लंके यांच्या मित्रासह एकाचा जागीच मृत्यू

पुणे- भरधाव कंटेनरने दिलेल्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुणे- अहिल्यानगर रस्त्यावर शिरूरजवळ संग्राम हॉटेलसमोर घडला. या अपघातात खासदार निलेश लंके यांच्या जिवलग मित्राचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एक भरधाव कंटेनर अत्यंत वेगात आला आणि त्याने समोरून येणाऱ्या वाहनांना उडवले. या विचित्र दुर्घटनेत एसटी महामंडळाची बस, एक फोर्ड एंडेव्हर कार, दुचाकी आणि…

Read More

विद्यार्थ्यांनो..पुणे महापालिका तुम्हाला देणार २५ हजार रुपयांची स्कॉलरशीप, त्यासाठी असा अर्ज करा 

पुणे महापालिका हद्दीतील दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दहावीसाठी मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाह्य योजना आणि बारावीच्या विद्यार्थांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाह्य योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना अनुक्रमे १५ हजार, तर बारावीसाठी २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येते. या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १७ ऑगस्टपासून सुरू होणार असून, ३१…

Read More

‘अथर्वला शरीरसंबंध ठेवायचे आहेत, तो मला गोळी देतोय”, मुलीचा आईला शेवटचा फोन, आणि..

बारामती- येथील २३ वर्षीय तरुणीचा संशयस्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणीने मृत्यूपूर्वी आईला फोन करून सांगितले होते की ” अथर्व मला गोळी देणार आहे, त्याला माझ्याशी शरीरसंबंध ठेवायचे आहेत” त्यामुळे तिला कोणती गोळी देण्यात आली? तिच्या मृत्युचे नेमके कारण काय याचा शोध पोलीस करत आहेत. मृत्युपूर्वी काही तास तरुणीचा आईला फोन आल्यामुळे या प्रकरणाला…

Read More

पुणे-सातारा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, तळेगावच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू, दोन जखमी 

शिरवळ -सातारा-पुणे रस्त्यावर शिरवळजवळ भरधाव कार डिवायडरला धडकून उलटली. या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ हॉटेल शिवालयसमोर ११ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वाएक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. वेदांत अर्जुन वारिंगे (रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (रा. कामशेत, मावळ), आदित्य बाळासाहेब गरुड (रा….

Read More

‘मुळशी पॅटर्न’च्या नावाने पुन्हा मुळशीची बदनामी नको; मुळशीकर आक्रमक

  पुणे -‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामुळे मुळशी तालुक्याची गुन्हेगारी अशी चुकीची ओळख निर्माण झाली असून, त्याचे दूरगामी परिणाम आजही मुळशीकरांना भोगावे लागत असल्याची भावना मुळशीकरांकडून व्यक्त होत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच विवाहाच्या बाबतीतही मुळशीकरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुळशी हा वारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा आणि कुस्तीगिरांचा तालुका आहे. त्यामुळे ‘मुळशी पॅटर्न’ ही गुन्हेगारीची…

Read More

पुणे शहरात उद्या मंगळवारी भाजपची तिरंगा रॅली, वाहतुकीच्या मार्गात होणार बदल जाणून घ्या

पुणे- शहरात मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून भाजपच्या वतीने भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये सुमारे १५ ते २० हजार दुचाकी सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या रॅलीमुळे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. फर्ग्युसन कॉलेज रोडवरील ललित महाल हॉटेल चौक येथून या रॅलीची सुरुवात होणार असून…

Read More

विमानतळजवळील नामांकित पबवर पोलिसांची धाड, दोघा मॅनेजरसह 8 जणांना अटक

पुणे- विमानतळ परिसरातील ‘द हौज कम्युन’ या पबवर रविवारी पहाटे तीन वाजता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अचानक छापा टाकून पबमधील दोघा मॅनेजरसह 8 जणांना अटक केली आहे. या पबमध्ये पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने रंगारंग पार्टी सुरू असल्याचे पोलिसांच्या या छाप्यात उघडकीस आले. सुमित रोहीदास गोटे (वय ३०, रा. येरवडा), नूर हुसेन शेख (वय ३०,…

Read More

खड्ड्यातील पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू , पुण्यातील दिघी गावातील घटना

पिंपरी- शाळेच्या मागे पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून एका १५ वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दिघीमधील मॅगझीन चौकाजवळ घडली. आश्वेत अनिल भोसले (वय १५ रा. संत गजानन महाराज नगर, दिघी ) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. आश्वेत हा दिघी येथील रामचंद्र गायकवाड शाळेमध्ये इयत्ता ९ वीत शिकत होता. घटनेची…

Read More

पुण्यात लक्ष्मी रोडवर ‘पे अँड पार्क’ योजना लागू करणार, पार्किंगसाठी इतके पैसे मोजावे लागणार

पुणे- पुणे महानगरपालिकेने शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंगच्या समस्येवर तोडगा म्हणून लक्ष्मी रस्त्यावर ‘पे अँड पार्क’ (Pay and Park) योजना लागू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. या निर्णयामुळे आता लक्ष्मी रोडवर खरेदीसाठी किंवा इतर कामांसाठी वाहन पार्क करताना नागरिकांना शुल्क मोजावे लागणार आहे. लक्ष्मी रोडवर दुकानदार आणि त्यांच्याकडील कर्मचारी वाहने उभी करतात. त्यामुळे…

Read More