ब्रेकिंग न्यूज

कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली- कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा किंवा मानवी तस्करीचा गुन्हा (FIR) दाखल केलाच पाहिजे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याची अंमलबजावणी न करणाऱ्यांना राज्यांच्या गृह सचिव, पोलीस महासंचालकांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात दररोज अनेक व्यक्ती बेपत्ता होतात. विशेषतः अल्पवयीन मुले गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे….

Read More

पहाटेच्या गाढ झोपेतच मृत्यूने गाठले, घाटकोपरमध्ये चाळीवर दरड कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबई – घाटकोपर पूर्व भागातील अशोकनगर परिसरातील गौसिया चाळीवर मोठी दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला तर काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज पहाटे ३ ते ४ च्या सुमारास घडली.  लोक गाढ झोपेत असतानाच डोंगराचा मोठा कडा थेट गौसिया चाळीतील २ ते ३ घरांवर कोसळला. काही कळण्याच्या आतच डोंगराच्या ढिगाऱ्याखाली…

Read More

भयानक ! नामांकित ब्रँड्सच्या दुधाच्या बनावट पिशव्या छापून त्यातून भेसळयुक्त दूध विक्री

मुंबई – अमुल आणि गोकुळ सारख्या नामांकित ब्रँड्सच्या नावाखाली बनावट दूध पिशव्या तयार करून त्यातून भेसळयुक्त दूध विकणाऱ्या एक रॅकेट मुंबई पोलिसांनी उध्वस्त केले आहे. वसई येथून मुख्य आरोपीसह ४ जणांना अटक केली आहे.  रामूलू गुरुवर्य बोडुपल्ली (वय ६५), लिंगय्या भिक्षमय्या गंटा (वय ४५), सैदूलू याद्या जंगीली (वय ३३), याद्या चंद्रय्या बतुला (वय ४६) अशी…

Read More

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प जुन्या मार्गानेच करण्यासाठी प्रयत्न करणार; पंतप्रधान मोदींचे आश्वासन

पुणे – जगातील १९ देशांमध्ये रेडिओ क्वाएट झोनच्या परिसरात सुरू असलेल्या प्रवासी तसेच मालवाहतूक रेल्वेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ जुन्या मार्गानेच व्हावा या मागणी संदर्भात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दिले.  आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान…

Read More

पुणे शहरात उद्या मंगळवारी भाजपची तिरंगा रॅली, वाहतुकीच्या मार्गात होणार बदल जाणून घ्या

पुणे- शहरात मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून भाजपच्या वतीने भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये सुमारे १५ ते २० हजार दुचाकी सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या रॅलीमुळे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. फर्ग्युसन कॉलेज रोडवरील ललित महाल हॉटेल चौक येथून या रॅलीची सुरुवात होणार असून…

Read More

परंपरागत कामगार कायदे लागू करा – कैलास कदम कामगार संघटनांचे देशव्यापी जेलभरो आंदोलन 

पिंपरी- केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेले चार नवीन कामगार कायदे कायमस्वरूपी रद्द करून जुने परंपरागत कामगार कायदे लागू करावेत या मागणीसाठी कामगार संघटनांनी देशव्यापी जेलभरो आंदोलन केले. पिंपरीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.  यावेळी आयटक चे अनिल रोहम, सीटू…

Read More

बारामती विमानतळावर पुन्हा एकदा विमान अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

बारामती- बारामतीचे विमानतळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान बारामती विमानतळावर उतरत असताना रनवेवरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे एक वाजता कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे…

Read More

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग बदलण्याच्या विरोधात समृद्धी महामार्गावर चक्कजाम

नाशिक- नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्यात आल्याने हा मार्ग आता वादात सापडला आहे. या निर्णयाविरोधात सिन्नर, संगमनेर, अकोले, नाशिकमध्ये नागरिकांनी आंदोलन केले तर आज सकाळी नऊ वाजल्यापासून समृद्धी महामार्गावर रास्तारोको आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या हायस्पीड रेल्वेचा पुणे–चाकण–राजगुरुनगर–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर–नाशिक असा मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील…

Read More

मिसिंग लिंकच्या चारही बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर आणि आतील भागात ओव्हरस्पीड कॅमेरे बसणार

पुणे- मुंबई द्रुतगती ( Pune-Mumbai Missing Link ) मार्गावरील वेगमर्यादेचे उल्लंघन रोखण्यासाठी या मार्गावरील चारही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक ओव्हरस्पीड कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अवजड वाहनांच्या बेकायदा प्रवेशावरही महामार्ग पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. ‘मिसिंग लिंक’मुळे या मार्गावर वाहनांचा वेग लक्षणीय वाढल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तुषार भुमकर यांचा…

Read More

अभिजीत दिपकेंनी ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची माफी मागावी, अन्यथा…

बीड- नीट पेपर लिक प्रकरणी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी दिपके यांनी सध्या वेशातील एका पोलीस निरीक्षकाला घराबाहेर काढले होते. दिपकेंनी या पोलीस अधिकाऱ्याला सगळ्यांसमोर झापले होते. या प्रकाराचा बीड मधील पोलीस बॉईज संघटनेनं निषेध केला आहे. दिपकेंनी संबंधित पीआयची पाय धरून…

Read More