ब्रेकिंग न्यूज

Vedh News

बेजबाबदारपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे तुषार भुमकर यांचा अपघाती मृत्यू

लोणावळा- मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या लिंबाच्या बोगद्यात वाकड येथील युवा नेते तुषार भूमकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बोगद्यामध्ये बेजबाबदारपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे तुषार भुमकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताच्या सी सी टीव्ही फुटेजमधून एक अतिशय धक्कादायक बाब पुढे आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री विचित्र भीषण अपघात झाला. भरधाव वेगात…

Read More

हिंजवडीमध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाची लोखंडी रॉडने वार करत निर्घृण हत्या, प्रेयसी जखमी

पुणे- एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेण्डच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली, या हल्ल्यात गर्लफ्रेण्ड देखील गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना गुरुवारी (दि. ७) हिंजवडी परिसरात घडली. सागर गायकवाड असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे तर दिनेश महादेव झांबरे असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव…

Read More

तुरुंगात असलेल्या राजपाल यादवच्या वडिलोपार्जित घराचा होणार लिलाव

मुंबई- अभिनेते राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. आता त्याच्या घरावरही संकट ओढावले आहे. बँकेने त्यांच्या वडिलोपार्जित घरावर जप्ती आणल्यामुळे राजपाल यादव यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ त्यांच्याकडील थकीत कर्ज वसूल करण्यासाठी त्यांची मालमत्ता लिलावात काढण्याच्या तयारीत आहे. ही मालमत्ता मध्य प्रदेशातील बांदा येथे असून त्याची किंमत 3.10…

Read More

‘क्या बोलती पब्लिक’ कॉकरोच जनता पार्टीची नवीन मोहीम ; अभिजित दिपके यांची घोषणा

छ. संभाजीनगर- कॉकरोच जनता पार्टी सप्टेंबर २०२६ पासून देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही नवीन मोठी मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेची अधिकृत घोषणा पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीनंतर केली. या मोहिमेच्या माध्यमातून सीजेपी देशातील 5 मोठ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा हा सर्वात मुख्य मुद्दा…

Read More

पुण्याची ओळख MH 12 कायम राहणार ; नवीन वाहन नोंदणी क्रमांक कसा असू शकतो ?

पुणे- पुण्याच्या MH 12 या वाहन नोंदणी कोडची ZZ ही शेवटची मालिका सुरु असून हा कोड इतिहासजमा होणार, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र हा कोड कायम ठेवण्यात यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. गडकरी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुण्याची ओळख असलेला MH…

Read More

ऐकलं जात नसेल तर आंदोलन होत असतात, मोहन भागवत यांनी साधला ‘जेन झी’शी संवाद

मुंबई- आंदोलन हा डायलॉगचा प्रकार आहे. ऐकलं जात नसेल तर आंदोलन होत असतात. आत्ता जे झालं ते ग्रेव्हिएन्सेस आहे. शिक्षण व्यवस्थेत अनेक गोष्टी व्यवस्थित नाहीत, बदल करायला हवा असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मला डोळे मिटून विश्वास ठेवायचं म्हंटलं, तर मी जेनझीवर डोळे मिटून विश्वास ठेवेन असेही मोहन भागवत म्हणाले. मुंबईत मोहन भागवत…

Read More

आधी संप मागे घ्या, मगच ऐकून घेऊ : निवासी डॉक्टरांना न्यायालयाने खडसावले !

मुंबई- होमियोपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत सशर्त नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सुमारे ७ हजार निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आणि रुग्णसेवा पार कोलमडली आहे. या संपावर स्वतःहून दखल (Suo Motu) घेत मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत तीव्र शब्दांत कानउघाडणी केली आहे. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने संपकरी डॉक्टरांच्या भूमिकेवर…

Read More

पुण्यातील ११ लाख मतदारांचे पत्ते उपलब्ध नाहीत: प्रारूप यादी २४ ऑगस्टला

पुणे- मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत पुण्यातील ११ लाख मतदारांचे पत्ते उपलब्ध नसल्याने आणि दोन लाख मृत मतदार आढळून आले आहेत. १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतुन ही नावे वगळण्यात येणार आहेत अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीना कळसकर यांनी दिली आहे. त्यामुळे एकूण मतदारांची संख्या सुमारे १२ ते १३ लाखांनी घटण्याची…

Read More

हडपसर, दापोडी विषारी दारू प्रकरणात मुख्य सूत्रधारासह ९ जणांवर ‘मोक्का’

पिंपरी- मिथेनॉलमिश्रित विषारी गावठी हातभट्टी दारू सेवनामुळे २१ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली. हडपसर आणि दापोडी- फुगेवाडी परिसरात ही भीषण घटना २६ मे ते २८ मे २०२६ या दरम्यान घडली होती. या गुन्ह्यातील आरोपींच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. मिथेनॉलमिश्रित विषारी गावठी हातभट्टी दारूचे सेवन केल्याने हडपसर परिसरातील…

Read More

दोन कोटींचा दंड वाचवण्यासाठी मागिलती १० लाखांची लाच, महिला तलाठी सह कोतवाल ‘एसीबी’च्या जाळ्यात

पुणे- सेनापती बापट रस्त्यावरील एका व्यावसायिक प्रकल्पाच्या खोदकामात ३२०० ब्रास अतिरिक्त खोदकाम झाल्याने सुमारे २ कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो अशी भीती कंत्राटदाराला दाखवण्यात आली होती. दंड वाचवण्यासाठी कंत्राटदाराकडे १० लाखांची लाच मागणाऱ्या महिला तलाठी आणि कोतवालाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठी आश्विनी दत्तात्रय कोकाटे (वय ३७) आणि कोतवाल महेश मधुकर मुंढे (वय…

Read More