ब्रेकिंग न्यूज

बेजबाबदारपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे तुषार भुमकर यांचा अपघाती मृत्यू

Share

लोणावळा- मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या लिंबाच्या बोगद्यात वाकड येथील युवा नेते तुषार भूमकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बोगद्यामध्ये बेजबाबदारपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे तुषार भुमकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघाताच्या सी सी टीव्ही फुटेजमधून एक अतिशय धक्कादायक बाब पुढे आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री विचित्र भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणारी फॉर्च्यूनर कारपुढे जाणाऱ्या आयशर टेम्पोला जोरात धडकली. या धडकेत फॉर्च्यूनरमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या तुषार भूमकर यांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले.

हा भीषण अपघात कसा झाला ते पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/share/v/198LPfxex9/

सी टीव्ही फुटेज पहिले असता त्यामध्ये असे दिसते आहे की बोगद्याच्या आतमध्ये, उजव्या बाजूच्या लेनमध्ये काही गाड्या आधीपासूनच बेकायदेशीरपणे उभ्या आहेत. रात्रीच्या वेळी सुमारे 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास तुषार भूमकर यांची काळ्या रंगाची फॉर्च्युनर कार अतिशय वेगात बोगद्यात प्रवेश करते. मात्र, समोरच गाड्या उभ्या असल्याचं पाहून उभ्या असलेल्या गाड्यांपासून वाचण्यासाठी फॉर्च्युनर कार अचानक लेन बदलते. मात्र, त्याचवेळी मधल्या लेनमधून एक मालवाहू टेम्पो संथ गतीने पुढे जात असतो. भरधाव वेगात असलेली फॉर्च्युनर कार अनियंत्रित होऊन थेट या मालवाहू टेम्पोवर पाठीमागून अत्यंत जोरात आदळते. ही धडक इतकी भयंकर आणि जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचं आणि गाडीचे तुकडे उडाल्याचे व्हिडीओत पाहायला मिळतं. यातच ड्राइव्हरच्या शेजारी बसलेल्या तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जखमी झालेल्यापैकी एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. सुदैवाने, अन्य प्रवाशांना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.