ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील ११ लाख मतदारांचे पत्ते उपलब्ध नाहीत: प्रारूप यादी २४ ऑगस्टला

Share

पुणे- मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत पुण्यातील ११ लाख मतदारांचे पत्ते उपलब्ध नसल्याने आणि दोन लाख मृत मतदार आढळून आले आहेत. १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतुन ही नावे वगळण्यात येणार आहेत अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीना कळसकर यांनी दिली आहे. त्यामुळे एकूण मतदारांची संख्या सुमारे १२ ते १३ लाखांनी घटण्याची शक्यता आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण सुरु आहे. या मोहिमेला ८ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदार असून आत्तापर्यंत ७५ लाख ८९ हजार ६६२ मतदारांना गणना अर्जाचे वाटप करण्यात आले आहे. मतदारांकडून गणना अर्ज भरून घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हे अर्ज टाकण्यात येत आहेत. अजूनही १५ लाख मतदारांनी गणना अर्ज घेतलेले नाहीत.
त्यामध्ये मृत, दुबार, आणि अनुपस्थित मतदारांची संख्या जास्त आहे.

यामधील ११ लाख मतदारांच्या अनुपस्थितीचा ३ वेळा पंचनामा करण्यात आला असून आयोगाच्या निर्देशानुसार हे पंचनामे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संकेतस्थळावर टाकण्यात आले आहेत. १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतुन ही नावे वगळण्यात येणार आहेत अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीना कळसकर यांनी दिली आहे.