ब्रेकिंग न्यूज

दिग्दर्शक शकील नुरानी यांना अटक, लैंगिक अत्याचार केल्याचा अभिनेत्रीचा आरोप

Share

बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जोरू का गुलाम सिनेमाचे दिग्दर्शक ७३ वर्षीय शकील नुरानी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर एका अभिनेत्रीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका 33 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित अभिनेत्रींच्या तक्रारीनुसार, शकील नुरानी यांनी आगामी चित्रपटाच्या चर्चेच्या बहाण्याने तिला घरी बोलावून घेतले. तिला नशेचे पदार्थ देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. व्हिडिओद्वारे धमकावल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून नूरानी यांना अटक केली आहे.

मालवणी पोलिसांनी BNS कलम 64(2) (M), 123, 351 (2) आणि 88 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, बोरिवली हॉलिडे कोर्टाने नुरानी यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शकील नूरानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून ओळखले जातात. त्यांनी 1990च्या दशकाच्या उत्तरार्धापासून बॉलिवूडमध्ये काम केले. शकील नूरानी यांच्या दिग्दर्शनातील प्रमुख चित्रपटांमध्ये ‘बडे दिलवाला’ (1999) आणि ‘जोरू का गुलाम’ (2000) यांचा समावेश होतो. या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.