ब्रेकिंग न्यूज

सोसायटीच्या आवारातच कारने चिमुरडीला चिरडले, भोसरी मधील धक्कादायक घटना

Share

भोसरी- पिंपरी चिंचवड शहरातील सेक्टर 12 परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सोसायटीत खेळणाऱ्या चिमुरडीला एका कार चालकाने चिरडले. या दुर्दैवी घटनेत चिमुरडी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वाकड मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ७ ऑगस्टला रात्री १० वाजता दरम्यान सेक्टर 12 या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी दीपक हर्क भूल (वय ३१ रा. सेकटोर १२ भोसरी ) यांनी विशाल संजय नारखेडे (वय ३१ सिंधुदुर्ग सोसायटी, सेक्टर १२, भोसरी) यांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार भोसरी परिसरातील सेक्टर १२ मधील अजिंक्यतारा सोसायटीच्या आवारात साडेचार वर्षीय चिमुरडी खेळत होती. त्याचवेळी एका कारने तिला धडक दिली. या अपघातात चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा संपूर्ण अपघात सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत