मामाच्या मुलाला सुरु असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलावर कोयत्याने वार ; सराईत गुंडाला अटक

मामाच्या मुलाला सुरु असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलावर कोयत्याने वार ; सराईत गुंडाला अटक 
Share

पिंपरी – मामाच्या मुलाला सुरू असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाच्या अल्पवयीन मुलावर सराईत गुंडाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी भागात ही घटना घडली. या प्रकरणी निगडी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संबंधित सराईत गुंडाला कोयत्यासह अटक केली आहे.

या प्रकरणी प्रवीण रामचंद्र चोपडे (वय ३२ रा. आकुर्डी ) एसनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी समाधान अशोक मोरे (रा. खंडोबामाळ आकुर्डी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या मामाच्या मुलाला मारहाण करत होता. जेव्हा फिर्यादी हे भांडण सोडवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी मध्ये पडले, तेव्हा आरोपीने संतापून “तुला पण खूप माज आलाय, थांब तुझ्याकडे बघतोच” असे म्हणून घरातून कोयता आणून फिर्यादी आणि त्यांच्या मुलावर कोयत्याने हातांच्या बोटावर कानाच्या मागे, मानेवर प्राणघातक वार केले.

घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्या जवळील कोयता जप्त केला आहे.

Vedh News