लग्न जमेना म्हणून वैफल्यग्रस्त तरुण मोबाइल टॉवरवर चढला ; मामुर्डी येथील प्रकार

लग्न जमेना म्हणून वैफल्यग्रस्त तरुण मोबाइल टॉवरवर चढला ; मामुर्डी येथील प्रकार
Share

पिंपरी- लग्न जुळत नाही म्हणून एका तरुणाने नैराश्यातून चक्क मोबाईल टॉवरवर चढून बसला. साडेतीन तास चाललेल्या या शोले स्टाईल नात्यानंतर अग्निशमन जवानांनी मोठ्या कौशल्याने तरुणाला खाली उतरवण्यात यश मिळवले. आश्चर्य म्हणजे त्यावेळी त्याची नियोजित वधू देखील त्याला खाली उतरण्यासाठी गयावया करताना पाहायला मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड परिसरातील मामुर्डी येथील गहुंजे स्टेडियम रस्त्यावर रविवारी (दि. १) एक तरुण मोबाइल टॉवरवर चढल्याचे दिसताच नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. सुरुवातीला हा तरुण टॉवरवर का चढला याचे कारण कोणालाही माहित नव्हते. मात्र चौकशी केल्यानंतर लग्न जमत नाही या वैफल्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. यावेळी त्या तरुणाची नियोजित वधू देखील त्या तरुणाला खाली उतरण्यासाठी गयावया करीत होती. एकूणच या ठिकाणी ‘शोले’ स्टाइल नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. पीएमआरडीएचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. प्रत्येकजण त्याला खाली उतरण्यासाठी साबगत होता. पण तो तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. कोणतीही इजा न होता तरुणाला खाली आणणे हे मोठे आव्हान अग्निशमन दलाला होते.

अखेर अत्याधुनिक ‘ब्रांटो’ हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मच्या मदतीने तरुणाला विश्वासात घेऊन त्याच्याशी संवाद साधून त्याला खाली उतरवले. साडेतीन तास हे नाट्य चालले.

Vedh News