ब्रेकिंग न्यूज

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत – संदीप बेलसरे

पिंपरी, पुणे,- आखाती देशातील इराण – इस्राईल, अमेरिका या देशातील युद्धाचा प्रत्यक्ष फटका हा आपल्या भारत देशातील उद्योगांवर झाला आहे. त्यात कच्च्या मालाची किंमत वाढणे, आपला निर्यातक्षम पक्का व कच्चा माल तसाच बंदरामध्ये पडून राहणे आयात होणाऱ्या मालामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास अशा धातूंचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे. या युद्धामुळे उद्योजक संकटात,…

Read More

महापालिकेच्या प्रत्येक विभागातील आदेश, परिपत्रकाची स्वतंत्र ‘स्थायी आदेश फाईल’ करण्याचे निर्देश 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांकडून वेळोवेळी जारी होणारे कार्यालयीन आदेश, परिपत्रके, सूचना, शासन निर्णय तसेच महत्त्वपूर्ण प्रशासकीय आदेश यांची व्यवस्थित नोंद व जतन करण्यासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र ‘स्थायी आदेश फाईल’ अथवा ‘कार्यालयीन आदेश फाईल’ तयार करून ती अद्ययावत ठेवावी, असे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. विभागप्रमुखांच्या…

Read More

पुणे मेट्रोचा विस्तार चाकण, राजगुरूनगर, तळेगाव शिक्रापूर पर्यंत होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

चाकण- चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील कोंडी सोडण्यासाठी राज्य सरकार मोठे पाऊल उचलणार आहे. या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना म्हणून पुणे मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. निगडी ते चाकणनंतर आता चाकण ते राजगुरुनगर आणि तळेगाव ते शिक्रापूर या मेट्रो मार्गांचा विकास आराखडा तयार करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More

किंचाळणे ऐकून लोक आले आणि तिची सुटका झाली ; पिंपरीत चिमुरडीवर सात भटक्या कुत्र्यांचा हल्ला

पिंपरी- पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस मांडला असून ७ भटक्या कुत्र्यांनी एका ४ वर्षाच्या चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना म्हेत्रे वस्ती भागात घडली. सुदैवाने या घटनेत चिमुरडी बचावली पण तिच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या. पिंपरी चिंचवडच्या म्हेत्रे वस्ती भागात भटक्या ७ भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केला. अशिंका मिश्रा असे या चिमुरडीचा नाव आहे. या…

Read More

डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर छापा

पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रूपये पकडले. तर पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करणार असल्याची चर्चा असलेले भाजपचे नेते अमोल बालवडकर यांच्या सासरी म्हणजेच चंद्रकांत कटके यांच्या घरी आयकर विभागाचे छापे पडले आहे. सकाळी सात वाजल्यापासून आयकर विभागाचे अधिकारी त्यांच्या घराची झाडाझडती घेत आहेत. चंद्रकांत कटके त्यांच्या वाघोली येथील…

Read More

राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन..

पिंपरी- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे “शिवजयंती” निमित्त शहराध्यक्ष श्री. योगेश मंगलसेन बहल यांच्या मार्गदर्शनात शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते “श्री. छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष योगेश बहल आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी…

Read More

स्मशानात मृतदेह ठेवला आणि सगळे ग्रामस्थ पळाले… आंबेगाव तालुक्यात अचानक काय घडलं?

पुणे- जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या सरहद्दीवरील वडगाव पीर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत शोकाकूल प्रसंगी अचानक ग्रामस्थांनी मृतदेह खाली सोडून पळ काढला. अत्यंत संवेदनशील वेळी नेमकं काय घडलं? याची जोरदार चर्चा पंचक्रोशीत होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पीर येथील स्थानिक स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं…

Read More

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुत्रवत ज्ञान द्यावे – डॉ. विठ्ठल वाघ

पिंपरी चिंचवड:लायन्स क्लब इंटरनॅशनल, झोन पसायदान च्या वतीने भोसरी येथे आयोजित उपक्रमशील शिक्षक सन्मान सोहळ्यात सुमारे ६० शिक्षकांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्याला ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ, लायन्स इंटरनॅशनल प्रांत ३२३४ चे प्रांतपाल लायन राजेश आगरवाल, त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकर आप्पा गुळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. झोन चेअरमन लायन मुकुंद…

Read More

धक्कादायक !! राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळीबारात हत्या

निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामध्ये त्यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याचे बोललं जात आहे. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांची…

Read More

पुनावळे भागात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, वैद्यकीय पदवी नसतानाही देत होता इंजेक्शन

पिंपरी- वैद्यकीय पदवी किंवा पात्रता नसतानाही रुग्णांची तपासणी करून औषधे व इंजेक्शन देणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर रावेत पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई १६ ऑगस्ट रोजी रात्री पांढरे वस्ती, पुनावळे येथील श्रीनाथ हॉस्पिटलजवळ करण्यात आली. भागवत टेटुराम निषाद (वय ३९) असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत टेटुराम निषाद हा वैद्यकीय पात्रता किंवा…

Read More