ब्रेकिंग न्यूज

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सदनिकाधारकांनी महिनाभरात घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणी घ्यावी

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे चार लाख सदनिकाधारकांना महिनाभरात घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणी कार्यान्वित करून घ्यावी लागणार आहे. सोसायट्यांमध्ये पीएनजीचे जाळे उपलब्ध असूनही एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्या नागरिकांनी १ ऑक्टोबरपूर्वी पीएनजी जोडणीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) केले आहे. एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक गिरीजा शंकर, वाणिज्यिक संचालक मेजर…

Read More

लेझर, बीम लाईट वापरल्याप्रकरणी पहिला गुन्हा! सांगवीच्या गणेश मंडळाच्या अध्यक्षाला १००० रु दंड आणि कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा 

पिंपरी – गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंदी घातलेल्या प्रखर लेझर आणि बीम लाईटचा वापर केल्या प्रकरणी सांगवी येथील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  बजरंग विनायक लकडे (वय ३४, रा. आदर्शनगर, पिंपळे निलख) असे शिक्षा सुनावलेल्या मंडळाच्या अध्यक्षाचे नाव आहे. पिंपळे निलख येथील जय भवानी मित्र मंडळाचा…

Read More

एटीएम सेंटरमध्ये ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, हातचलाखीने कार्ड बदलून लांबवले ३० हजार रुपये

पिंपरी -एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ५९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मदतीचा बहाणा करत एका भामट्याने त्यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलले आणि ३० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना खराबवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी जितेंद्र कुमार रामजी तिवारी (वय ५९, रा. खराबवाडी, मूळ रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या…

Read More

केंद्रीय विहार सोसायटी मध्ये बालगोपालांची रामलीला संपन्न

पिंपरी- लहान मुलांना मोबाईल पासून दूर करण्यासाठी आणि आपली कला, संस्कृती समजण्यासाठी त्यांनी सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमात सहभागी होण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे. तसेच त्यांच्यामध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे असे मत मोशी प्राधिकरण येथील केंद्रीय विहार सोसायटीचे सचिव मुकुंद पवार यांनी व्यक्त केले.     रामनवमी निमित्त मोशी, प्राधिकरण…

Read More

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात गुन्हा

‘तुला मुलगा होत नाही,’ असे म्हणत पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षकाने बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करून गर्भपात करण्यास भाग पाडले असा आरोप पत्नीने फिर्यादीमध्ये केला आहे. धनाजी रंगराव टोणे आणि अनसूया रंगराव टोणे (रा. पी. एस. व्हिला, शेवाळेवाडी, हडपसर) अशी…

Read More

आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू 

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या पीए यांच्या १२ वर्षाच्या मुलीचा संशयस्पद स्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  प्राथमिक माहितीनुसार रात्री आईचं आणि मुलीचं किरकोळ भांडण झालं, त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. मुलगी मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. मात्र सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळला आहे….

Read More

गायिका केतकी माटेगावकरकडून आर्थिक मदतीची विनंती ; कुणासाठी मागत आहे आर्थिक मदत ?

गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर, जिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत पैशांची मदत मागितली आहे. गार्गी नावाच्या एका चिमुकलीला झालेल्या दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी केतकीने आपल्या चाहत्यांना विनंती केली आहे. केतकीने पोस्ट केलेल्या व्हिडीओत तिने सांगितलं की, “तिला एक दुर्मिळ असा आजार आहे, एसएमए टाइप 1 म्हणजेच स्पाइनल मस्कुलर ॲट्रॉफी. यामध्ये आता तिला तिची मानही…

Read More

EMI वर मोबाइल घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी… आरबीआय ने बँकांना काय अधिकार दिले ?

मुंबई- महागडे स्मार्टफोन बऱ्याचदा एकरकमी पैसे न देता हप्त्यावर घेतला जातो. त्यामुळे हप्त्यावर मोबाईल, टॅबलेट आणि लॅपटॉप घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. EMI चा हप्ता थकल्यानंतर काही वित्तीय संस्था ग्राहकांचा मोबाईल रिमोट लॉक करत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. यामुळे फोनचा वापरच बंद होत असल्याने काम, संवाद आणि आपत्कालीन सेवांवरही परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक…

Read More

वाहनधारकांनो सावधान ! चलन मिळाल्यानंतर ‘इतक्या’ दिवसात दंड भरावा लागेल, अन्यथा…

नव्या केंद्रीय मोटार वाहन नियम १६७ च्या सुधारणेनुसार चलन मिळाल्यापासून ४५ दिवसांत दंड भरणे किंवा ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रांसह त्याला आव्हान देणे अनिवार्य आहे. या मुदतीत हरकत घेतली नाही, तर संबंधित चलन स्वीकारल्याचे गृहीत धरले जाईल. नव्या तरतुदीनुसार पोलिस किंवा अधिकृत अधिकारी चलन प्रत्यक्ष अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जारी करू शकतील. इलेकक्ट्रॉनिक देखरेख यंत्रणांद्वारे चलन आपोआप तयार…

Read More

पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राने पत्नीच्या मदतीने केली मित्राची हत्या

पुणे – एकाच खोलीत सोबत राहणाऱ्या मित्राने आपल्या पत्नीच्या मदतीने मित्राची गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या करून मृतदेह पोत्यात भरून निर्जन ठिकाणी फेकून दिला. शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावत पती-पत्नी दोघांनाही जेरबंद केले आहे. गौरव ऊर्फ अक्षय अशोक वायकर (वय 24, मूळ रा. थेऊर, ता….

Read More