मुलाला पळवून नेण्याची धमकी देऊन विवाहितेचा छळ ; पतीविरुद्ध गुन्हा

मुलाला पळवून नेण्याची धमकी देऊन विवाहितेचा छळ ; पतीविरुद्ध गुन्हा
Share

पुणे – मुलाला आईपासून पळवून नेण्याची धमकी देत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील येवलेवाडी परिसरातून ही घटना समोर आली आहे. 

पीडित ४६ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिचे पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाने संबंधित पतीला पुढील दोन महिने मुलाला भेटण्यास मनाई केली होती. मुलाला केवळ न्यायालयाच्या आवारातच भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, ही अट धुडकावून पतीने कोंढव्यातील शाळेत जाऊन व्यवस्थापनाकडून मुलासंदर्भातील माहिती गोळा केली.

न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत, मुलाला आईपासून हिरावून घेऊन जाण्याची धमकी देऊन विवाहितेला सतत मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. फिर्यादीचे नातेवाईक तसेच दिवंगत वडिलांच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखी क्रमांकावरून एस एम एस करून किंवा कॉल करून धमकी दिली जात होती. या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलिसांत धाव घेतली. येवलेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

 

Vedh News