दिवाळीनिमित्त पिंपरी वल्लभनगर आगारातून ४१० जादा बसगाड्या धावणार

दिवाळीनिमित्त पिंपरी वल्लभनगर आगारातून ४१० जादा बसगाड्या धावणार
Share

पिंपरी – दिवाळीनिमित्त मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन विभागाने विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड आगारातून ३ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत एकूण ४१० बसफेऱ्या सोडण्यात येणार आहेत. 

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक परिसरात कामानिमित्त राहणारे अनेक नागरिक कुटुंबासह मूळ गावी जातात. त्यामुळे या काळात बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढते. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील गावांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. ही गर्दी लक्षात घेऊन यंदा मागील वर्षाच्या तुलनेत अधिक बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

यामध्ये २११ अतिरिक्त, तर १९९ नियमित नियोजित बसफेऱ्यांचा समावेश आहे. पिंपरी (वल्लभनगर) आगारातून या विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत.

महिला प्रवाशांना तिकिटामागे ५० टक्के सवलत लागू आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘अमृत योजने’अंतर्गत मोफत प्रवासाची सोय आहे.

Vedh News