वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्र प्रदर्शनास सुरुवात
पुणे- गणेशोत्सवानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे फेस्टीव्हल यांच्या वतीने पुण्यातील विविध वृत्तपत्रांतील ४५ छायाचित्रकारांनी टिपलेली सुमारे तीनशे छायाचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे भरवण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. खासदार प्रणिती शिंदे, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल,…
