ब्रेकिंग न्यूज

‘त्या’ माजी सैनिकाचा मृतदेह आढळला ; झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस

Share

पुणे- बायकोचा खून करून 17 वर्षीय मुलाचा खुनाचा प्रयत्न करणाऱ्या माजी सैनिकाचा मृतदेह चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी आढळला आहे. झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. महेंद्र शिवाजी दौंडकर असे या माजी सैनिकाचे नाव आहे.

बहिणीशी बोलत नसल्याचा रागातून महेंद्र दौंडकर याने आपली पत्नी दीपा दौंडकर हिचा राहत्या घरी खून केला. ही बाब मुलाच्या लक्षात आल्यानंतर त्याने आपला १७ वर्षाचा मुलगा अर्थव याचा चाकूचा हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. ३० ऑगस्ट) रात्री अकराच्या सुमारास घडली होती.

खेड पोलीस पुढील तपास करीत आहेत.