ब्रेकिंग न्यूज

धक्कादायक! मुंबईत नौदल कर्मचाऱ्याने पत्नी आणि दोन निष्पाप बालकांसह जीवन संपवले 

मुंबई – एकाच चार मृतदेह आढळून आल्याच्या घटनेने मुंबई हादरून गेली आहे. कुलाबा येथील ‘नेव्ही नगर’ परिसरात नौदलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह दोन निष्पाप बालकांसह जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  या दुर्दैवी घटनेत दोन महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचा आणि तीन वर्षांच्या मुलाचाही समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या…

Read More

वाढदिवसाचा केक खाल्ला आणि आठजण रुग्णालयात दाखल.. काय होते त्या केकमध्ये ?

मुंबई- वाढदिवसासाठी आणलेला केक खाल्यानंतर सात ते आठ जणांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना नालासोपारा येथील नीलकंठेश्वर बिल्डिंगमध्ये उघडकीस आली आहे. या केकमध्ये मृत पाल सापडल्याचा दावा करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. उर्मिला वर्मा (32), सलोनी गुप्ता (16), सुदीक्षा शाह (19), आफिया इद्रिस (24), रुबी शाह (40), शिव गुप्ता (10),…

Read More

अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्या प्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोणंद – मागील आठवड्यात आळंदीमध्ये विवाह लावून दिल्याप्रकरणी मंगल कार्यालयाच्या संचालकांसह नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण ताजे असतानाच फलटण तालुक्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. फलटण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर दि….

Read More

महिलेच्या मोबाईलवर मेसेज केला आणि जीव गेला, पुण्यातून इसमाचे अपहरण करत सांगलीत निर्घृण हत्या

सांगली – नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज केल्याच्या किरकोळ कारणावरून एकाला आपला जीव गमवावा लागला. तीन तरुणांनी त्यांचे पुण्यातून अपहरण करून सांगलीला नेऊन त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगली शहर पोलिसांना मिळालेल्या एका छोट्याशा ‘क्ल्यू’मुळे या भयंकर गुन्ह्याचा अवघ्या पाच दिवसांत उलगडा झाला आहे. गोविंद माधवराव उपासे (वय 59, रा. तपोधाम सोसायटी…

Read More

निळ्या ज्युपिटरवरून यायचा आणि बुलेट चोरायचा, १९ बुलेट गाड्या पळवणाऱ्या चोरट्यास अटक 

पुणे- निळ्या रंगाच्या ज्युपिटर गाडीवरुन येऊन बारामती शहर व परिसरातील बुलेट चोरुन नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. तसेच हा राज्य राखीव पोलीस दलाच्या टेक्निकल विंगमधील पळून आलेला जवान असल्याचे निष्पन्न झाले आहे.  समाधान बाळू काळे (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वीही फलटण, बारामती, शिरुर परिसरात वाहन…

Read More

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 37 अधिकारी आणि अंमलदारांचा राष्ट्रपती पदकाने गौरव

पुणे- पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पदक, अतिउत्कृष्ट सेवापदक, उत्कृष्ट सेवापदक आणि विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह 21 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवापदक व उत्कृष्ट सेवापदक मिळाले आहे. तर 15 पोलीस अधिकाऱ्यांना…

Read More

सहा वर्षाच्या चिमुरड्याला घरी बोलावून..आळंदीमधील संतापजनक प्रकार

पिंपरी – अवघ्या ६ वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला घरात बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संतापजनक घटना आळंदी (ता. खेड) येथे घडली.  मिळालेल्या माहितीनुसार, एका १९ वर्षीय तरुणाने ६ वर्षांच्या अल्पवयीन निष्पाप मुलाला फूस लावून आपल्या घरात बोलावून त्याने मुलावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार जुलै महिन्यापासून ते ८ ऑगस्ट या दरम्यान…

Read More

वाहतूक पोलिसांकडील ई-चलन मशिन मुख्यालयात जमा, काय आहे पुण्याच्या पोलीस आयुक्तांचा आदेश ?

पुणे- वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईपेक्षा वाहतूक सुरळीत करण्यावर भर द्यावा, त्यातून वाढती वाहतूक कोंडी आणि प्राणघातक अपघातांना आळा घालावा अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार दिल्या आहेत. तसेच अंमलदारांकडील ई-चलन मशिन मुख्यालयात जमा करून दंडाच्या कारवाईला तात्पुरता विराम दिला आहे. हा आदेश ३१ ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे. वाहतूक विभागाने प्रमुख चौक, वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची…

Read More

१५ दिवसात मालकी हक्क सिद्ध करा अन्यथा बेवारस वाहन समजून होणार जाहीर लिलाव

पुणे – शहरातील विविध भागांतून हटवण्यात आलेली तब्बल १ हजार ३१७ दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी बेवारस वाहने हडपसरमधील रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया येथील समर्थनगर वाहन डम्पिंग यार्डमध्ये जमा करण्यात आली आहेत. यामध्ये आपले वाहन असल्यास १५ दिवसात हक्क सांगून वाहन घेऊन जा अन्यथा बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव करण्याची प्रक्रिया वाहतूक शाखेने सुरू केली आहे. पोलिस उपायुक्त…

Read More

किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला, डेक्कन परिसरातील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमधील प्रकार

पुणे – सोशल मीडियावरील रिल्सला लाईक आणि कमेंट्स करण्याच्या क्षुल्लक कारणावरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घातल्याचा प्रकार घडला आहे. डेक्कन परिसरातील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या टोळक्यात दोन मुलींचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डेक्कन येथील ‘फ्लाईंग जिप्सी’ या कॅफेमध्ये पहाटेच्या सुमारास पार्टी रंगली…

Read More