ब्रेकिंग न्यूज

हातात बिअरच्या बाटल्या घेत पुण्यात परप्रांतीय तरुणांचा हैदोस, चार जणांना अटक 

पुणे – दारूच्या नशेत भरधाव कारमधून हातामध्ये बिअरच्या बाटल्या घेऊन मध्यरात्री स्टंटबाजी करणाऱ्या चार परप्रांतीय तरुणांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.  पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. दररोज गुन्हेगारीच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. परप्रांतीय तरुणांनी रात्रीच्या वेळी पुण्यातील रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. हातात बिअरच्या बाटल्या घेऊन भरधाव…

Read More

चंदुकाका सराफ यांची सोन्याची बिस्किटे घेऊन पळालेल्या सराईत चोरट्याला चंद्रपूर येथून अटक

पुणे – चंदुकाका सराफ अँड सन्स या दुकानातून सोने खरेदी करण्याचा बहाणा करुन १४ लाख ७८ हजार रुपयांची सोन्याची बिस्किटे घेऊन पळून गेलेल्या सराईत चोरट्याला चंदननगर पोलिसांनी चंद्रपूर येथून जेरबंद केले आहे. सिद्धार्थ देविदास झेंडे (वय ३८, रा. म्हसोबाची वाडी, ता. इंद्रापूर) असे या चोरट्याचे नाव आहे. चंदननगर येथील चंदुकाका सराफ या दुकानात ३ व…

Read More

गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची रोकड लुटून चोरटे पसार 

पिंपरी – थेरगाव परिसरात पहाटेच्या वेळी एक थरारक घटना घडली आहे. रुग्णालयाबाहेर उभ्या केलेल्या कारच्या काचा फोडणाऱ्या टोळक्याला रोखणे व्यापाऱ्याला भलतंच महागात पडलं. या व्यापाऱ्याच्या गळ्याला कोयता लावून रोकड लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नीरज हकीम सोळंके (वय २१) आणि सूरज हकीम सोळंके (वय १९) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वैभव आनंदराव…

Read More

२२ लाखांची लाच मागणाऱ्या उत्पादन शुल्क निरीक्षकाला पुण्यात रंगेहाथ अटक

पुणे- मद्यविक्री परवाना नूतनीकरणासाठी २२ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या उत्पादन शुल्क विभागातील एका वरिष्ठ निरीक्षकाला ACB च्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. जितेंद्र हरिश्चंद्र पाटील असे लाच स्वीकारणाऱ्या वरिष्ठ उत्पादन शुल्क अधिकाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील एका मद्यविक्री दुकानाच्या परवान्याचे नूतनीकरण रखडले होते. यासाठी दुकानदाराने उत्पादन शुल्क कार्यालयात अर्ज केला होता. मात्र फाईल पुढे नेण्यासाठी संबंधित…

Read More

कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली- कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा किंवा मानवी तस्करीचा गुन्हा (FIR) दाखल केलाच पाहिजे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याची अंमलबजावणी न करणाऱ्यांना राज्यांच्या गृह सचिव, पोलीस महासंचालकांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात दररोज अनेक व्यक्ती बेपत्ता होतात. विशेषतः अल्पवयीन मुले गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे….

Read More

कंटेनरने तीन वाहनांना दिली भीषण धडक ; खासदार निलेश लंके यांच्या मित्रासह एकाचा जागीच मृत्यू

पुणे- भरधाव कंटेनरने दिलेल्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुणे- अहिल्यानगर रस्त्यावर शिरूरजवळ संग्राम हॉटेलसमोर घडला. या अपघातात खासदार निलेश लंके यांच्या जिवलग मित्राचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एक भरधाव कंटेनर अत्यंत वेगात आला आणि त्याने समोरून येणाऱ्या वाहनांना उडवले. या विचित्र दुर्घटनेत एसटी महामंडळाची बस, एक फोर्ड एंडेव्हर कार, दुचाकी आणि…

Read More

पहाटेच्या गाढ झोपेतच मृत्यूने गाठले, घाटकोपरमध्ये चाळीवर दरड कोसळून दोघांचा मृत्यू

मुंबई – घाटकोपर पूर्व भागातील अशोकनगर परिसरातील गौसिया चाळीवर मोठी दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला तर काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज पहाटे ३ ते ४ च्या सुमारास घडली.  लोक गाढ झोपेत असतानाच डोंगराचा मोठा कडा थेट गौसिया चाळीतील २ ते ३ घरांवर कोसळला. काही कळण्याच्या आतच डोंगराच्या ढिगाऱ्याखाली…

Read More

भयानक ! नामांकित ब्रँड्सच्या दुधाच्या बनावट पिशव्या छापून त्यातून भेसळयुक्त दूध विक्री

मुंबई – अमुल आणि गोकुळ सारख्या नामांकित ब्रँड्सच्या नावाखाली बनावट दूध पिशव्या तयार करून त्यातून भेसळयुक्त दूध विकणाऱ्या एक रॅकेट मुंबई पोलिसांनी उध्वस्त केले आहे. वसई येथून मुख्य आरोपीसह ४ जणांना अटक केली आहे.  रामूलू गुरुवर्य बोडुपल्ली (वय ६५), लिंगय्या भिक्षमय्या गंटा (वय ४५), सैदूलू याद्या जंगीली (वय ३३), याद्या चंद्रय्या बतुला (वय ४६) अशी…

Read More

‘अथर्वला शरीरसंबंध ठेवायचे आहेत, तो मला गोळी देतोय”, मुलीचा आईला शेवटचा फोन, आणि..

बारामती- येथील २३ वर्षीय तरुणीचा संशयस्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणीने मृत्यूपूर्वी आईला फोन करून सांगितले होते की ” अथर्व मला गोळी देणार आहे, त्याला माझ्याशी शरीरसंबंध ठेवायचे आहेत” त्यामुळे तिला कोणती गोळी देण्यात आली? तिच्या मृत्युचे नेमके कारण काय याचा शोध पोलीस करत आहेत. मृत्युपूर्वी काही तास तरुणीचा आईला फोन आल्यामुळे या प्रकरणाला…

Read More

पुणे-सातारा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, तळेगावच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू, दोन जखमी 

शिरवळ -सातारा-पुणे रस्त्यावर शिरवळजवळ भरधाव कार डिवायडरला धडकून उलटली. या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ हॉटेल शिवालयसमोर ११ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वाएक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. वेदांत अर्जुन वारिंगे (रा. तळेगाव दाभाडे), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (रा. कामशेत, मावळ), आदित्य बाळासाहेब गरुड (रा….

Read More