ब्रेकिंग न्यूज

नवले पुलावर पुन्हा अपघात ५ ते ६ वाहनांची धडक रिक्षाचालक गंभीर

पुणे- कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे ५ ते ६ वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातामुळे येथील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. अपघाताची घटना समोर आल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात एका रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रिक्षाचालक…

Read More

पिंपळवंडी बालिका हत्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार – सुनेत्रा पवार

मुंबई – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची शेतात नेऊन निर्घृण…

Read More

२२ लाखांच्या अमली पदार्थांसह राजस्थानातील दोघेजण गजाआड, मलठणमध्ये मध्यरात्री झाली कारवाई

पुणे- शिरूर तालुक्यातील मलठणगावच्या हद्दीमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दुचाकीसह २२ लाख रुपये किमतीचे ११० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहेत. सुरेंदसिंह भैरुसिंह राठोड उर्फ राजपुत (वय २४) आणि श्रवण तेजाराम बिष्णोई (वय ३१), (दोघेही मूळ राहणार राजस्थान सध्या मलठण) आरोपींच्या विरोधात ‘एनडीपीएस’ कायद्याच्या…

Read More

जुन्नर तालुक्यात पिंपळवंडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शेतात नेऊन निर्घृण हत्या 

जुन्नर – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची शेतात नेऊन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडली आहे. घराशेजारीच राहणाऱ्या तरुणाने हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केल्याचे उघडकीस आलं आहे.  काही दिवसांपूर्वी नसरापूर बलात्कार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. आता पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी येथे घडली आहे. घराशेजारी…

Read More

सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद, मातेची मृत्यूशी झुंज

बीड- वैद्यकीय क्षेत्राला लाजवणारी एक धक्कादायक घटना बीड जिल्हा रुग्णालयात घडली आहे. सिझेरियन शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका 19 वर्षीय नवमातेच्या जीवावर बेतले आहे. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी महिलेच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागद तसेच सोडून दिल्याचा गंभीर आरोप होत आहे. सध्या ही तरुणी पुण्यातील ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. संध्या गायकवाड असे या तरुणीचे…

Read More

पुण्यात आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू 

पुणे- पुणे पोलिसांनी शहरात १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. मात्र, या दरम्यान राहुल गांधींचा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सलग येणारे सण आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दीही होते. यातच अतिक्रमण हटवण्याची कारवाईसुद्धा केली जाणार आहे. अशावेळी गर्दी होऊन…

Read More

सिंहगड रस्त्यावर अवैध देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे – सिंहगड रोड परिसरात एका घरात देशी-विदेशी दारूचा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून २ इसमांना अटक केली. ही कारवाई पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-3 च्या पथकाने सोमवारी (दि. १७)मध्यरात्री २ वाजता केली. अभिषेककुमार सुरजन बिन, (वय 20 वर्षे, रा. साई नगर हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे), आदित्य राजू…

Read More

माथाडी मंडळाच्या नावाने बनावट पावत्या देऊन वाहनचालकांकडून बेकायदेशीर वसुली; रांजणगाव येथे गुन्हा दाखल

 रांजणगाव, पुणे :रांजणगाव एम.आय.डी.सी. परिसरातील मे. टाटा स्टील डाउनस्ट्रीम प्रॉडक्ट्स लि. या आस्थापनेच्या परिसरात पुणे माथाडी मंडळाच्या नावाचा गैरवापर करून काही व्यक्तींकडून वाहनचालक, वाहतूकदार, पुरवठादार व व्हेंडर्स यांच्याकडून कथितरीत्या बेकायदेशीरपणे पैसे वसूल केले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात FIR क्र. 0380/2026, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी गुन्हा…

Read More

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला कात्रज परिसरातून घेतले ताब्यात, युनिट २ ची कारवाई

पुणे- गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कात्रज चौक परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. ही कारवाई पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने सोमवारी (दि. १७) रोजी केली. रोशन उर्फ सोन्या घोरपडे (वय २९ रा. वडगाव बुद्रुक ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिराडे…

Read More

महाळुंगे येथे रस्त्यावरील खड्ड्याने घेतला ११ वर्षीय मुलाचा जीव

पुणे – रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ११ वर्षीय मुलाचा ट्रक खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास महाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ ही दुर्घटना घडली.  या घटनेची माहिती अशी की ११ वर्षाचा मुलगा त्याचे वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून ट्यूशनला जात होता. रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्यांची दुचाकी घसरल्यामुळे मुलगा रस्त्यावर पडला…

Read More