कपड्यांच्या दुकानात महिला ग्राहकाची पिशवी लंपास; ४० वर्षीय महिलेला अटक

पिंपरी- पिंपरी येथील झुलेलाल कपडा मार्केटमधील लेडीज वेअर दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिला ग्राहकाची पिशवी आणि त्यातील साहित्य व रोख रक्कम चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी छाया मच्छिंद्र पवार (वय ४०, रा. आंबेडकरनगर, दापोडी, पुणे; मूळ रा. करमाळा, जि. सोलापूर) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.७) सायंकाळी ६.३० ते ७ वाजण्याच्या दरम्यान पिंपरी येथील झुलेलाल मेन कपडा मार्केटमधील ‘ग्रीन लेडी’ लेडीज वेअर या दुकानात फिर्यादी महिला दुकानात कपडे खरेदी करत असताना, आरोपी महिलेने फिर्यादीची पिशवी, त्यातील साहित्य आणि रोख रक्कम चोरली.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.






