ब्रेकिंग न्यूज

पीएमपीएमएल बसमधून फक्त ५०० रुपयात घ्या ताम्हिणी घाटातील निसर्गाचा आनंद

पुणे- सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा सहलीचा आनंद घेत आहेत. पुणेकर पर्यटन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. फक्त ५०० रुपयांमध्ये पुणेकरांना मुळशी, ताम्हिणी घाटातील निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने त्यासाठी एका विशेष बसचे नियोजन केले आहे. पीएमपीने ९ अ हा नवीन जलद मार्ग सुरु केला आहे. या नवीन विशेष बसचा…

Read More

गिरीश प्रभुणे यांना सोलापूर विद्यापीठाकडून सन्माननीय ‘डि.लिट’ प्रदान

सोलापूर- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आज, गुरुवारी ‘डि.लिट’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल मा राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण प्रा. डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी,…

Read More

आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!

पिंपरी (प्रतिनिधी) :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगरनेते यशवंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दिंडी सांगता समारंभ आणि वारकरी श्रमिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संत तुकाराम नगर येथे सलग दुसऱ्या वर्षी दिंडी काढण्यात आली. दिंडीत हजारो वारकरी, श्रमिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या…

Read More

आषाढी एकादशी उत्साहात साजरी, पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा

पंढरपूर- संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी) अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी केली जात आहे. या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारंपरिक शासकीय महापूजा संपन्न झाली. सलग २० वर्षे वारी करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील माने दांपत्याला यंदा मुख्य पूजेत मुख्यमंत्र्यांसोबत बसण्याचा मान मिळाला. आज पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठुरायाची…

Read More

नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य! – डाॅ. श्रीपाल सबनीस

पिंपरी – ‘कविवर्य नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य होते. त्यांची कविता मानवमुक्तीची कविता आहे!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी सायन्स पार्क सभागृह, चिंचवड येथे काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव…

Read More

भावी काळात बहुभाषिक कौशल्य महत्त्वाचे! – डॉ. सविता केळकर

  पिंपरी – ‘जागतिक पातळीवर भावी काळात बहुभाषिक कौशल्य महत्त्वाचे असून ते आत्मसात करणे गरजेचे आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ जर्मन भाषातज्ज्ञ डॉ. सविता केळकर यांनी केले. भाषा अकॅडमी, पिंपरी आयोजित परकीय भाषा शिक्षक परिषद २०२६ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डाॅ. सविता केळकर बोलत होत्या. जर्मन भाषातज्ज्ञ अरविंद लिगाडे, ज्येष्ठ विद्यापीठ भाषा संचालक जावेद अत्तार, पुणे…

Read More

जाते श्रमसंस्कृतीचे प्रतीक! – पद्मश्री गिरीश प्रभुणे

पिंपरी – ‘जाते हे ग्रामसंस्कृती आणि श्रमसंस्कृतीचे प्रतीक आहे. बाई जात्यावर दळायला बसली की ओव्या सुचत आणि त्यातून आपले मौखिक लोकसाहित्य समृद्ध झाले!’ असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी गोशाळा सभागृह, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले. शब्दधन काव्यमंच आयोजित जात्यावर दळताना साहित्य विश्वातील पहिल्या ‘सुंदर माझे जाते गं…’ या अभिनव कविसंमेलनाचे…

Read More

दुर्गा टेकडी: अभियांत्रिकी विश्वातील तीन क्षेत्रांचा संगम असलेला देशातील एकमेव प्रकल्प

भोपाळ, मध्य प्रदेश येथे शहर विकास मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी संकेत भोंडवे (IAS) यांनी निगडी येथील दुर्गा टेकडी बद्दल असलेल्या आपल्या भावना आणि काही आठवणी सांगितल्या आहेत. वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें। पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुणदोष अंगा येत ॥२॥ आकाश मंडप पृथिवी आसन। रमे तेथे…

Read More

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

मुंबई- आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान…

Read More