ब्रेकिंग न्यूज

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंस्धेला रंगली देशभक्तीपर गीतांची मैफिल

पुणे- भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंस्धेला ‘आपला म्युझिकल ग्रुप’च्या वतीने देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात अनिल घाडगे, रणजित पाटील, भूषण देवधर, शशिकांत वाडते, विजय कांबळे, उमा मेनन, विद्या हजारे पाटील, भारती सातव, छाया अय्यर, स्नेहलता चव्हाण, सुषमा वनारसे यांनी कराओकेच्या साथीने सुरेल आवाजात गाणी सादर…

Read More

क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात स्वातंत्र्यदिन साजरा

चिंचवड – ‘नाही होत स्वतंत्रता शिवकथा घोटून भाटापरी घ्यावे लागतसे शिवाजी बाजीपरी हे मस्तक स्वहस्तावरी!” असा सशस्त्र क्रांतीचा संदेश देऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचा यज्ञ पेटवून आजही भारतीय तरुणांच्या मनात ती ज्योत तेवत ठेवणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करीत शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी चिंचवडगावातील क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा…

Read More

लावणीच्या कार्यक्रमासाठी सेन्सॉर सर्टिफिकेट आवश्यक, अश्लीलता असल्यास होणार कारवाई

मुंबई- ग्रामीण भागातील लोकांपासून शहरी प्रक्षकांपर्यंत सर्वांना लावणीचे ठसकेबाज नृत्य पाहायला आवडते. अलीकडच्या काळात लावणीच्या कर्यक्रमामधून अश्लीलतेचे प्रदर्शन होत असल्याचे दिसून येते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. लावणीचा कार्यक्रम सादर करण्यापूर्वी राज्याच्या सेन्सॉरचे योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष…

Read More

फरासखाना पोलीस ठाण्याच्या जागेत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा विस्तार होणार, पुणे पोलिसांची तत्त्वतः मान्यता 

पुणे – पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारीकरणासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मंदिराशेजारी असलेल्या फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा मंदिराच्या विस्तारिकरणासाठी हस्तांतरित करण्यास पुणे पोलिसांनी तत्त्वतः ‘ना हरकत’ दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे पाठवला आहे. बुधवार पेठेतील महापालिकेच्या सिटी सर्व्हे…

Read More

माजी जिल्हाधिकारी महेश झगडे यांची सिंहस्थ कुंभमेळा विषयी फेसबुक पोस्ट चर्चेत; काय म्हणाले महेश झगडे ?

नाशिक- नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होत असलेल्या विकासकामांमुळे अगोदरच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यात आता माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांची सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जुलै २०२८ या दरम्यान होणार आहे. त्यामुळे…

Read More

‘मुळशी पॅटर्न’च्या नावाने पुन्हा मुळशीची बदनामी नको; मुळशीकर आक्रमक

  पुणे -‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामुळे मुळशी तालुक्याची गुन्हेगारी अशी चुकीची ओळख निर्माण झाली असून, त्याचे दूरगामी परिणाम आजही मुळशीकरांना भोगावे लागत असल्याची भावना मुळशीकरांकडून व्यक्त होत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच विवाहाच्या बाबतीतही मुळशीकरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुळशी हा वारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा आणि कुस्तीगिरांचा तालुका आहे. त्यामुळे ‘मुळशी पॅटर्न’ ही गुन्हेगारीची…

Read More

ओम प्रतिष्ठानच्या विद्यादान योजनेत दहा मुलींचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व

पिंपरी- आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत मुलींचे उच्च शिक्षण थांबू नये, यासाठी ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेने यावर्षी २०० मुलींच्या शिक्षणाला मदत करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दहा मुलींची निवड करून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत पोहोचविण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रीती नारायण यांनी कार्तिक सरांच्या सहकार्याने दहा मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत त्यांच्या उच्च शिक्षणासाठी…

Read More

करिअरमध्ये जबाबदारी आणि कर्तव्याचे भान ठेवा – वसंत नामा गवळी

पिंपरी- सोशल मीडियाच्या आभासी जगतामध्ये वावरताना, आपले करिअर घडत असताना नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य देखील पार पाडण्याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवावे. लिंगायत गवळी समाजातील तरुणाईचा उपयोग सक्षम, सुदृढ, सुसंस्कृत समाज उभारणीसाठी झाला पाहिजे. उच्च शिक्षण घेऊन पुढे गेलेल्या तरुणांनी आपल्या मागच्या पिढीला मार्ग दाखविला पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष वसंत नामा…

Read More

पिंपरीत भक्तिरसाचा जल्लोष ! संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

पिंपरी- जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पिंपरी गावामध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. टाळ-मृदंगाचा गजर, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने आणि विठ्ठलनामाच्या अखंड घोषाने संपूर्ण पिंपरी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पिंपरी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात नगरसेवक संदीप वाघेरे व पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक,…

Read More

परवानगी शिवाय सराव नाही… ढोल-ताशा पथकासाठी महापालिका नियमावली करणार

पुणे- पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या तयारीला हळू हळू रंग येत आहे. या उत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे ढोल ताशा पथक. परंतु या पथकाच्या सरावामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुणे महापालिका ढोल-ताशा पथकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याच्या तयारीत आहे. या नियमावलीनुसारच पथकांना सराव करता येईल. पुणे शहरातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. ढोल-ताशांसह लेझीम, टिपरी,…

Read More