विद्यार्थी वाहतुकीसाठी राज्य शासनाची नवी नियमावली ; विद्यार्थी वाहतूक आता आणखी सुरक्षित
पुणे- राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत शालेय बस आणि व्हॅनसाठी नवीन नियम लागू केले आहेत. १६ जुलै रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या या नव्या नियमांमुळे विद्यार्थी वाहतूक आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक होणार आहे. नव्या नियमावलीनुसार, मुंबई वगळता इतर क्षेत्रांमधील स्कूल बस आणि व्हॅनच्या वापराची मर्यादा १५ वरून थेट २०…
