ब्रेकिंग न्यूज

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली, पण जरांगे आंदोलनावर ठाम

Share

मुंबई- मुंबईच्या आझाद मैदानावर १९ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे हे उपोषण करणार होते. पण आझाद मैदान पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. आमित सहानी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत. त्याचा दाखला देत पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. मात्र जरांगे यांनी मुंबईत जाणारच असा खणखणीत इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या उपोषणाचा आज १४ वा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारताना मागील वर्षी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात आंदोलन करताना नियम व अटींचा भंग केल्याचे आझाद मैदान पोलिसानी म्हटले आहे. मात्र मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना मुंबईला जाण्यासाठी तयार राहण्याचं आवाहन केले आहे. “मुंबईला गेल्याशिवाय न्याय मिळत नाही. सरकारला भरपूर वेळ दिला, पण सरकारने ऐकले नाही. मराठा समाजावर अन्याय सुरू आहे. परवानगी मिळो अथवा न मिळो, पण मुंबईला जाणार,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.

आम्ही त्यांच्या भावनांचा नेहमीच आदर केलेला आहे. सरकार केंव्हाही मराठा समाजाच्या हितासाठीच काम करेल. मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत राज्य शासन अत्यंत सकारात्मक आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा निर्णय मागे घ्यावा असे आवाहन मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केले आहे.