ब्रेकिंग न्यूज

तुकाराम मुंढे यांच्या ‘एफडीए’ला उच्च न्यायालयाचा दणका! ठोठावला ५ लाखांचा दंड

मुंबई – संपूर्ण राज्यात एफडीएकडून होत असलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांकडून तुकाराम मुंढे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र याच कारवाईबद्दल एफ डी ए ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर पुण्यातील मिठाई दुकानाच्या प्रकरणात कोर्टाने सोमवारी एफडीएला पाच लाख रुपयांचा दंड लावून दणका दिला आहे. याबाबतची हकीकत अशी की एफडीएने पुण्यातील गुरूनानक डेअरी…

Read More

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंस्धेला रंगली देशभक्तीपर गीतांची मैफिल

पुणे- भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंस्धेला ‘आपला म्युझिकल ग्रुप’च्या वतीने देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात अनिल घाडगे, रणजित पाटील, भूषण देवधर, शशिकांत वाडते, विजय कांबळे, उमा मेनन, विद्या हजारे पाटील, भारती सातव, छाया अय्यर, स्नेहलता चव्हाण, सुषमा वनारसे यांनी कराओकेच्या साथीने सुरेल आवाजात गाणी सादर…

Read More

पिंपळे निलख मधील नागरी समस्या सोडवू व क्रीडा संकुल उभारू – आमदार शंकर जगताप

पिंपरी- सातत्य, सचोटी आणि सत्यता याचा अवलंब करा, व्यसनापासून दूर रहा असे मार्गदर्शन आमदार शंकर जगताप यांनी केले. तसेच पिंपळे निलख परिसरातील पाणी, कचरा, वाहतूक या नागरी समस्या सोडवून भावी नगरसेवक सचिन साठे यांनी मागणी केल्याप्रमाणे येथे उत्तम क्रीडा संकुल लवकरच उभे करू अशी माहिती आ. जगताप यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिली. पिंपळे निलख येथे…

Read More

तीन अल्पवयीन मुलांचा येरवड्यामधील निरीक्षणगृह कर्मचाऱ्यावर हल्ला

पुणे – तीन अल्पवयीनांनी येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील मुलांच्या शासकीय निरीक्षणगृहात एका कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष किसन कुंभार (वय ५०, रा. नंदादीप सोसायटी, चऱ्होली फाटा) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

‘कॉकरोच जनता पार्टी’ नंतर आता नव्या पक्षाचा उदय..एका रात्रीत लाखाहून अधिक फॉलोअर्स

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना ‘दिमागी नक्सल’ हा शब्दप्रयोग वापरला होता. आता याच शब्दाचा आधार घेत ‘दिमागी नक्सल’ नावाच्या नव्या ऑनलाईन पक्षाची स्थापना झाली आहे. पाहता पाहता एका रात्रीत या पक्षाच्या इन्स्टाग्राम पेजला १,८१,००० हून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला स्वातंत्र्यदिनानिमित्त संबोधित करताना…

Read More

पुनावळे भागात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, वैद्यकीय पदवी नसतानाही देत होता इंजेक्शन

पिंपरी- वैद्यकीय पदवी किंवा पात्रता नसतानाही रुग्णांची तपासणी करून औषधे व इंजेक्शन देणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर रावेत पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई १६ ऑगस्ट रोजी रात्री पांढरे वस्ती, पुनावळे येथील श्रीनाथ हॉस्पिटलजवळ करण्यात आली. भागवत टेटुराम निषाद (वय ३९) असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत टेटुराम निषाद हा वैद्यकीय पात्रता किंवा…

Read More

प्रेमाचा त्रिकोण ! प्रेमप्रकरणातून तरूणावर जीवघेणा हल्ला, पुण्यातील येरवडा भागातील प्रकार

पुणे- माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस ? असा जाब विचारत नवीन प्रियकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने जुन्या प्रियकराला भररस्त्यात गाठलं आणि त्याला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना येरवडा भागातील पुण्यातील गोल्फ क्लब रोडवरील नेताजी चौक परिसरात हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुणाचे पूर्वी एका तरुणीसोबत…

Read More

चाकण एमआयडीसीमधील रस्ते दुरुस्तीसाठी ३१ ऑगस्ट डेडलाईन, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी १६ ऑगस्ट २०२६ रोजी चाकण येथे उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेतली. या बैठकीत ३१ ऑगस्ट पर्यंत चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या गंभीर समस्येने त्रस्त झालेल्या उद्योजकांनी…

Read More

‘फ्लाईंग जिप्सी’ हॉटेल राडा प्रकरणी रीलस्टार माधवी कुंभारला अटक

पुणे- डेक्कन जिमखाना परिसरातील फ्लाईंग जिप्सी हॉटेलमध्ये झालेल्या राड्यानंतर याच हॉटेलसमोर एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याचे प्रकरण मागील आठवड्यात घडले होते. आता या प्रकरणी रीलस्टार माधवी कुंभारसहित आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावरील रिल्सला लाईक आणि कमेंट्स करण्याच्या क्षुल्लक कारणावरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने डेक्कन परिसरातील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये धुमाकूळ घातल्याचा…

Read More

भरधाव वेगात जाणाऱ्या रुग्णवाहिकेची कंटेनरला धडक, आजोबा नातवाचा मृत्यू

पुणे- भरधाव वेगात जाणाऱ्या रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुणे – सोलापूर महामार्गावर केडगावच्या हद्दीत रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडला. शेटीबा वडजी मुधोळकर (वय ७०) आणि देवानंद सुरेश मुधोळकर (वय १७ दोघेही राहणार १२ नं पाटी, मांजर, ता. रेणापूर, जि….

Read More