ब्रेकिंग न्यूज

अजित गव्हाणे यांना निवडून आणण्यासाठी युवा सेनेची ताकद पणाला लावणार

भोसरी –भाजपचा एक एक उमेदवार विधानसभेच्या निवडणूकीत पराभूत करणे हा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा मुख्य अजेंडा असला पाहिजे. ज्या भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चोरण्याबरोबर, सरकार पाडण्यापर्यंत निंदनीय काम केले. त्यांना धडा शिकवलाच पाहिजे असा निर्धार युवा सेनेच्या मेळाव्यात करण्यात आला. भोसरी विधानसभेमध्ये गेल्या दहा वर्षात दाखवण्यासारखे काहीच काम केले नाही म्हणून आता…

Read More

सहकारनगरमध्ये बेकायदा सावकारी करून कोट्यवधींची वसुली; तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे – कोणताही सावकारीचा वैध परवाना नसताना नागरिकांची आर्थिक पिळवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सहकारनगर परिसरात विनापरवाना सावकारी करून फिर्यादीकडून तब्बल १ कोटी १३ लाख ५० हजार रुपये वसूल केल्या उघडकीस आले आहे. हा प्रकार २०१५ ते २०१९ या कालावधीत घडला. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड….

Read More

लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग निहाय जनसंपर्क कार्यालय उभारणार – आ. अण्णा बनसोडे यांची घोषणा

 पिंपरी- पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कासारवाडी भागात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. मतदार संघातील लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग निहाय जनसंपर्क कार्यालय उभारण्याची घोषणा यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली.         कासारवाडी येथील सूर्यमुखी महादेव मंदिराचे…

Read More

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत – संदीप बेलसरे

पिंपरी, पुणे,- आखाती देशातील इराण – इस्राईल, अमेरिका या देशातील युद्धाचा प्रत्यक्ष फटका हा आपल्या भारत देशातील उद्योगांवर झाला आहे. त्यात कच्च्या मालाची किंमत वाढणे, आपला निर्यातक्षम पक्का व कच्चा माल तसाच बंदरामध्ये पडून राहणे आयात होणाऱ्या मालामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास अशा धातूंचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे. या युद्धामुळे उद्योजक संकटात,…

Read More

“गाेंधळ घातल्यास थेट निलंबित केले जाईल” पिंपरीच्या महापौरांचा भाजप नगरसेवकांना इशारा

पिंपरी- ‘भाजप एक कुटुंब असून सर्वांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सभागृहात बाेलायची संधी देताे. त्यानंतरही मध्येच काेणी उठतो, बाेलतो, सहा महिने हे पाहतोय, आता माझी सहनशिलता संपली आहे. मी आता काेणाचेच ऐकणार नाही. गाेंधळ घातल्यास थेट निलंबित केले जाईल,’असा इशारा महापाैर रवी लांडगे यांनी भाजप नगरसेवकांना दिला. पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा तहकूब…

Read More

किंचाळणे ऐकून लोक आले आणि तिची सुटका झाली ; पिंपरीत चिमुरडीवर सात भटक्या कुत्र्यांचा हल्ला

पिंपरी- पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस मांडला असून ७ भटक्या कुत्र्यांनी एका ४ वर्षाच्या चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना म्हेत्रे वस्ती भागात घडली. सुदैवाने या घटनेत चिमुरडी बचावली पण तिच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या. पिंपरी चिंचवडच्या म्हेत्रे वस्ती भागात भटक्या ७ भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केला. अशिंका मिश्रा असे या चिमुरडीचा नाव आहे. या…

Read More

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे लोकार्पण संपन्न

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराच्या न्यायालयीन इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक व अभिमानास्पद ठरला. शहराला दीर्घ प्रतीक्षेनंतर स्वतःचे हक्काचे “जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय” मोरवाडी येथील जुनी न्यायालयीन इमारत येथे अत्यंत सन्माननीय वातावरणात व मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते झाडाच्या रोपाला पाणी घालून करण्यात आली. या न्यायालयाचे लोकार्पण मुंबई उच्च न्यायालयाचे…

Read More

म्यूल अकाउंटद्वारे 150 कोटींचा गंडा घालणारा अखेर गजाआड ; असा करायचा सायबर फ्रॉड

पिंपरी- ‘इन्व्हेस्टमेंट फ्रॉड’ आणि ‘ऑनलाइन टास्क’च्या नावाखाली नागरिकांना तब्बल १५० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या आळंदी पोलीस ठाण्याच्या ‘सायबर सेल’ने ही थरारक कारवाई केली. या प्रकरणी मोशी येथून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाच्या नऊ वेगवेगळ्या बँकांमधील खात्यांमधून तब्बल १…

Read More

किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला, डेक्कन परिसरातील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमधील प्रकार

पुणे – सोशल मीडियावरील रिल्सला लाईक आणि कमेंट्स करण्याच्या क्षुल्लक कारणावरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घातल्याचा प्रकार घडला आहे. डेक्कन परिसरातील ‘फ्लाईंग जिप्सी’ कॅफेमध्ये पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या टोळक्यात दोन मुलींचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डेक्कन येथील ‘फ्लाईंग जिप्सी’ या कॅफेमध्ये पहाटेच्या सुमारास पार्टी रंगली…

Read More

आळंदी नगरपरिषदेमार्फत आकर्षक शिल्पाची उभारणी

आळंदी (वेध न्यूज ) :-आळंदी शहरातील श्री भैरवनाथ महाराज चौक येथे आळंदी नगरपरिषद मार्फत ज्ञानेश्वर माऊली व चांगदेव यांच्या भेटीच्या प्रसंगावर आधारित शहराच्या वैभवात भर पाडणारे सुंदर असे शिल्प उभारले आहे. आळंदी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आळंदीत होत असते. तसेच आषाढी वारी व कार्तिकी निमित्त होणाऱ्या संजीवन…

Read More