बावधनमध्ये १ लाख ४० हजाराचा गांजा जप्त ; २१ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा

बावधनमध्ये १ लाख ४० हजाराचा गांजा जप्त ; २१ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा
Share

पुणे- बावधन पोलिसांनी कारवाई करून १ लाख ४० हजार रुपये किमतीचा १४ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. बावधन गावच्या हद्दीतील बावधन चौपाटी चौकाजवळ मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्थ विजय काळे (वय २१, रा. एविलॉन हौसिंग सोसायटी, फ्लॅट क्रमांक १०२, सनसिटी, सिंहगड रोड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई अक्षय शहाजी लाटे यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२७) रोजी मध्यरात्री १२.२५ वाजण्याच्या सुमारास बावधन गावच्या हद्दीतील बावधन चौपाटी चौकाजवळ आरोपी पार्थ काळे याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगलेला १४ ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. या अमली पदार्थाची किंमत १ लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

त्यानुसार बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७५४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ठाकरे करीत आहेत.

Vedh News