ब्रेकिंग न्यूज

विद्यानंद बापट यांना मारहाण ; माध्यमांशी बोलत असतानाच अज्ञातांनी केला हल्ला

पुणे- गणेशोत्सव किंवा सार्वजनिक उत्सवात डिजे किंवा लाऊडस्पीकर वापरावर बंदी आणावी अशी मागणी केल्यानंतर सोशल मीडियावर विद्यानंद बापट हे नाव घराघरात पोचले आहे. याच विषयावर टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना काही तरुणांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सव काळात पुण्यात डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणावरुन वाद सुरु आहे. या मुद्द्यावर पुण्यातील…

Read More

विद्यानंद बापट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, निवृत्त पुणेकर प्राध्यापक पोलिसात तक्रार देणार

पुणे- गणेशोत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांविरोधात आवाज उठवणाऱ्या पुण्यातील विद्यानंद बापट हे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. बापट हे सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांच्या मागणीला पुणेकरांनी देखील समर्थन दिले आहे. परंतु कोथरूड येथे राहणारे निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी आणि सदाशिव पेठेत राहणाऱ्या शशांक महाजन यांनी बापट यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.धनंजय कुलकर्णी…

Read More

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कात्रज चौकात मराठा समाजाचा ‘रस्ता रोको’

पुणे – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुण्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी दुपारी ४ वाजता कात्रज चौकात जोरदार ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. ​आंदोलनादरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून “एक मराठा, लाख मराठा” अशा जोरदार घोषणा दिल्या. यामध्ये महिलांचा देखील सहभाग होता. यामुळे पुणे-सातारा महामार्ग आणि शहरातील प्रमुख जोड…

Read More

पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून सात पिस्तुलांची चोरी, कचरा गोळा करणाऱ्या इसमास अटक

पुणे- एका कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीने पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातून चक्क सात पिस्तुले चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बंडगार्डन पोलिसांच्यामुद्देमाल कक्षामध्ये घडला. पिस्तुले चोरणाऱ्या व्यक्तीने पोलिस ठाण्यासमोरच एका व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवला. संबंधित व्यक्तीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी धावाधाव करून पिस्तुले चोरणाऱ्या इसमास ताब्यात घेतले. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राकेशकुमार संजयकुमार…

Read More

गुन्हेगाराकडील पिस्तूल हाताळताना अचानक गोळी सुटून तरुण जखमी; एकाला अटक तर गुन्हेगार फरार

पुणे – गुन्हेगाराकडील पिस्तूल हाताळताना अचानक चाप दाबला गेल्याने गोळी सुटून तरुणाच्या मांडीत शिरल्याने तो जखमी झाला. त्याच्या साथीदाराने जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी साथीदाराला अटक केली आहे. मात्र पिस्तूल बाळगणारा गुन्हेगार मात्र तेथून पळून गेला. अविनाश दादासो मोरे (वय १९, रा. दत्तनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे….

Read More

शिरूर तालुक्यातील ७४३.५७ हेक्टर शेतजमिनीवरील प्रस्तावित औद्योगिक भूसंपादनाला स्थगिती 

शिरूर- तालुक्यातील पाबळ, खैरैनगर आणि धामारी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्याच्या प्रस्तावित प्रक्रियेला तसेच ७/१२ उताऱ्यावर ‘अधिसूचित क्षेत्र’ असा शेरा नोंदविण्याच्या कारवाईला तात्काळ स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या विषयासंदर्भात मंत्रालय, मुंबई येथे मंत्री मेघनाताई बोर्डीकर, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पाबळ, धामारी आणि खैरैनगर येथील बाधित…

Read More

‘पगारी सुट्टी द्या आणि खाण्यापिण्याची सोय करा’ ; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे- ‘गणेशोत्सव आणि इतर सणांमध्ये कर्णकर्कश डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात येणार असेल, तर या उत्सवांच्या कालावधीत राज्य सरकारने पगारी सुट्टी जाहीर करावी. तसेच, शहरात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय शहर सोडून इतरत्र करावी. अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मात्र हा खर्च नागरिकांच्या करातून नाही, तर…

Read More

‘त्या’ माजी सैनिकाचा मृतदेह आढळला ; झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस

पुणे- बायकोचा खून करून 17 वर्षीय मुलाचा खुनाचा प्रयत्न करणाऱ्या माजी सैनिकाचा मृतदेह चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी आढळला आहे. झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. महेंद्र शिवाजी दौंडकर असे या माजी सैनिकाचे नाव आहे. बहिणीशी बोलत नसल्याचा रागातून महेंद्र दौंडकर याने आपली पत्नी दीपा दौंडकर हिचा राहत्या घरी खून केला. ही…

Read More

डीजे विरोधात रान पेटले! आणखी एका पुणेकरांची थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दाद 

पुणे – गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वीच पुणेकरांनी डीजे विरोधातील आपला आवाज आणखी तीव्र करण्यास सुरुवात केली आहे. विद्यानंद बापट यांच्या बरोबर आता शरद केळकर नावाची व्यक्ती मैदानात उतरली आहे. केळकर यांनी थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितली आहे. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात राहणारे शरद केळकर यांनी पुण्यातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल…

Read More

पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आक्रमक, जोरदार राडा, पोलिसांना पाचारण 

पुणे – वर्षभराच्या परीक्षा देऊनही पुन्हा नापास केल्याच्या आरोप करत विद्यार्थ्यांनी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जोरदार राडा केल्याचा प्रकार सोमवारी घडला.   हाती आलेल्या माहितीनुसार विशेष परीक्षा देऊनही काही विद्यार्थी पुन्हा नापास झाल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात राजकीय पक्षाच्या युवा संघटनेचे कार्यकर्ते…

Read More