ब्रेकिंग न्यूज

केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी घेतला विमान चालवण्याचा अनुभव

पुणे (प्रतिनिधी) बाणेर येथील यो स्काईज एव्हीएशन इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या एअरबस ए३२० फ्लाइट सिम्युलेटरचे उदघाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अत्याधुनिक सिम्युलेटरवरून विमान चालवण्याचा अनुभव घेतला. उद्घाटनप्रसंगी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः या सिम्युलेटरवर आभासी पद्धतीने “मुंबई विमानतळावरून एअरबस ए ३२० उडवण्याचा अनुभव घेतला…

Read More

महाराष्ट्रातील सर्व सामाजिक घटकांना समान न्याय मिळवून देणार – अण्णा बनसोडे

पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे समाजातील वंचित, पीडित, शोषित, कष्टकऱ्यांचे आर्थिक स्वावलंबन झाल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकणार नाही. यासाठी सामाजिक, राजकीय भागीदारीसोबतच मागास घटकांची आर्थिक प्रगती करणे गरजेचे आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मागासवर्गीय घटकांना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी सामाजिक…

Read More

भविष्यातील अडचणी आणि आर्थिक गरजा ओळखून गुंतवणूक करा – नंदकुमार काकिर्डे

पुणे – बचतीबरोबरच सर्वांनी शेअर मार्केट मधील गुंतवणूक व व्यावहारिक कौशल्य समजून घ्यावे. यातूनच आर्थिक साक्षरता येते. शेअर बाजारात धोका आहे, परंतु देशात शंभर वर्षांपासून जास्त काळ झाला शेअर मार्केटमध्ये व्यवहार सुरू आहेत. वाढत्या महागाईशी आपल्या बचतीचे सूत्र जुळले पाहिजे. यासाठी भविष्यातील आपल्या अडचणी आणि आर्थिक गरजा ओळखून गुंतवणूक करावी असा सल्ला जेष्ठ अर्थ सल्लागार…

Read More

असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यात ऐतिहासिक वेतन करार.. करारामुळे नक्कीच माथाडी कामगारांचे जिवनमान सक्षम होणार – इरफानभाई सय्यद….

पिंपरी प्रतिनिधी :- ट्रान्सपोर्ट आणि माथाडी कामगार देशाचा कणा आहे. त्यांच्यामुळेच दळणवळण व्यवस्था सक्षम आहे. त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटना नेहमीच अग्रेसर असते. असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यात नुकताच माथाडी कामगारांच्या पगारवाढीचा ‘लेव्ही’सह 23 टक्के करार संपन्न झाला. हा करार जानेवारी 2025 पासून लागू झाला असून, कराराची मुदत तीन…

Read More

स्व.अण्णासाहेब पाटील यांचे कार्य असंघटित कामगारांसाठी दीप स्तंभासारखे.. कामगार नेते इरफान सय्यद..

पिंपरी:-स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त केसबी चौकातील अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी असंख्य माथाडी कामगार उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर ६०-७० च्या कालखंडात कामगार मोठ्या प्रमाणात असंघटित होते. तेव्हा कायदे नव्हते त्यामुळे त्यांचे शोषण व्हायचे. आरोग्याच्याही समस्या होत्या. अशा परिस्थितीत स्व. अण्णासाहेब पाटील यांनी कामगारांचे संघटन केले आणि त्यांच्या व त्यांच्या बरोबरील सहकार्याच्या…

Read More

श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील मंदिर निर्मितीस गती : भाविकांच्या उदंड प्रतिसादामुळे तुकोबारायांचे पहिले मंदिर पूर्णत्वाच्या मार्गावर

पिंपरी : संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त वारकरी संप्रदायाचे भूषण ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माउली) आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे पार पडला. भाविकांच्या उदंड प्रतिसादात पार पडलेल्या सोहळ्यामुळे, श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणाऱ्या भव्यदिव्य मंदिर निर्मितीस गती मिळाली आहे. भाविकांनी सढळ हाताने मदत केल्यामुळे संत तुकोबारायांचे…

Read More

एसबीपीआयएम मध्ये अभिनेते अनिल गवस आणि सई खलाटे यांच्या उपस्थितीत “झिंग – २०२५” चे आयोजन

पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे “झिंग २०२५” हा सांस्कृतिक कार्यक्रम, विविध बौद्धिक स्पर्धा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन प्रसंगी गुरुवारी (दि.२० मार्च) “मिसेस इंडिया २०२४” या फॅशन शोमध्ये प्रथम रणरअप झालेल्या सई खलाटे आणि शनिवारी (दि. २२ मार्च) वार्षिक…

Read More

नेहरूनगर न्यायालयात वकिलांनी घेतले ‘ई फाइलिंग’ चे प्रशिक्षण

पिंपरी : पिंपरी नेहरूनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकिलांसाठी ई फायलिंग व संगणकीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम रविवारी (दि. १६) घेण्यात आला. ई-फायलिंगसाठी वकिलांची नोंदणी, दावा/तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, जुन्या प्रकरणात वकीलपत्र दाखल करणे, न्यायालयीन कामकाज आदींबाबत माहिती देण्यात आली. त्याला वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय (पुणे) आणि दिवाणी व…

Read More

नाना नानी पार्क मित्र मंडळ चा स्तुत्य उपक्रम

पिंपरी – नाना नानी पार्क मित्र मंडळ, इंद्रायणी नगर, भोसरी ही एक धर्मदाय आयुक्त रजिस्टर सेवाभावी संस्था आहे. मंडळाची स्थापना १२ वर्षांपूर्वी म्हणजे ०३/०३/२०१३ ला झाली. मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळातर्फे वृक्ष संवर्धन (झाडे लावा, झाडे जगवा) हा उपक्रम गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ रोजी सकाळी ७ वाजता ओ सर्कल ग्राउंड, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पाठीमागे, इंद्रायणी नगर…

Read More

स्व. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या वाल्मीक कराडला फाशी द्या..शिवसेना युवासेना, भोसरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून जोडे मारो आंदोलन…

भोसरी प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निंदनीय आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करीत शिवसेना युवासेना, भोसरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध व्यक्त करीत क्रूर आणि खुनी वाल्मीक कराड याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे, शिवसेना…

Read More