ब्रेकिंग न्यूज

जेलमध्ये भेटले, सायबर क्राइमचा प्लॅन आखला आणि ज्येष्ठाचे ८५ लाख लुबाडले

पुणे- सायबर गुन्ह्यात तब्बल दीड वर्षे न्यायालयीन कोठडीत राहिलेल्या आरोपीसोबत येरवडा कारागृहात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी एका ज्येष्ठ नागरिकाला शेअर बाजारात पैसे गुंतवून मोठा फायदा मिळण्याचे आमिष दाखवून तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक केली.

Read More

दहशत माजवणारा व्हिडिओ शेअर केला, पोलिसांनी हिसका दाखवला

बारामती- एका तरुणाने हातात पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन एक धमकीवजा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. सुपा पोलिसांच्या नजरेस हा व्हिडिओ आल्यानंतर त्यांनी या तरुणाला आपला पोलिसी हिसका दाखवला. प्रेम प्रताप जगताप असे व्हिडीओ शेअर केलेल्या तरुणाचे आहे. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा…

Read More

निगडी प्राधिकरणात चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी- निगडी प्राधिकरण परिसरात चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकमान्य हॉस्पिटलजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अमोल शिंदे (वय 20) आणि मनोज शिंदे (वय 26) अशी मृत्यू झालेल्या दोन्ही कामगारांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की काल बुधवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास हे दोन कामगार चेंबरमध्ये अडकल्याची माहिती…

Read More

सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना येरवडा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट, अग्रवाल कुटुंबाचा आरोप

पुणे- संपूर्ण देशात जगलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील दोन संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना येरवडा कारागृहात VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडातील दोन संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना येरवडा तुरुंगात VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप…

Read More

एटीएम सेंटरमध्ये ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, हातचलाखीने कार्ड बदलून लांबवले ३० हजार रुपये

पिंपरी -एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ५९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मदतीचा बहाणा करत एका भामट्याने त्यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलले आणि ३० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना खराबवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी जितेंद्र कुमार रामजी तिवारी (वय ५९, रा. खराबवाडी, मूळ रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या…

Read More

तरुणीचे अपहरण करून सेक्स रॅकेटसाठी वापर, ३७ वर्षीय आरोपीला अटक

पिंपरी – डेटिंग एप वरून ओळख झालेल्या तरुणीची फसवणूक करून तिचा वापर सेक्स रॅकेटसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किवळे येथील लोढा बेलमोंडो या उच्चभ्रू सोसायटीत एक महिन्यापासून हा प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. सुरु होता प्रकारसोसायटी मध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील…

Read More

त्याच्याबरोबर दारू प्यायला बसली, वाद झाला आणि तिने उचलला दगड… 

पुणे – दारू पिऊन झालेल्या वादातून एका महिलेने दगडाने डोक्यात व छातीत मारून एकाची निर्घृण हत्या केली. ही घटना रविवारी सात वाजण्याच्या सुमारास कासारसाई- कूसगाव रस्त्यावरील कृष्ण मंदिरापुढील वन विभागाच्या जागेत घडली. हनुमंत सोपान शितोळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी मयूर शितोळे (३०, कासारसाई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जयवंता भगवंत तिडके…

Read More

आंतरराज्य ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी एअरहोस्टेस सह एकाला अटक

मुंबई- गुजरातच्या वडोदरा येथून मुंबईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या मलेशियन एअरलाईन्सच्या माजी एअरहोस्टेसला तिच्या साथीदारासह सूरत क्राईम ब्रँचने अटक केली आहे. वडोदराहून एका कारमधून मोठ्या प्रमाणावर ‘एमडी’ ड्रग्ज मुंबईला नेले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. मानसी सय्यद (वय ४१) आणि सोहेल सुलेमान शेख (वय २०) अशी…

Read More

पुण्यातील विषारी गावठी दारू प्रकरणात आणखी दोघांना अटक

पुणे- विषारी गावठी दारू प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष मकोका न्यायालयाने त्यांना एक सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, सखोल तपासासाठी आरोपींची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. आर्यन संजीव धोत्रे (वय २४) आणि कल्पेश अशोक अग्रवाल (वय २९) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत हडपसर पोलीस…

Read More

वाकडमध्ये ट्रॅव्हल्स कार्यालयात घुसून तोडफोड; महिन्याला ५० हजारांच्या हप्त्याची मागणी

वाकड – येथील भुजबळ चौक परिसरात डॉलफिन ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात घुसून एका तरुणाने कार्यालयातील सामानाची तोडफोड करून कार्यालय चालवायचे असेल तर दर महिन्याला ५० हजार रुपये हप्त्याची मागणी केली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कार्तिक हनुमंत बारवे (वय २३, रा. सोळा नंबर कॉलनी क्रमांक १, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार…

Read More