ब्रेकिंग न्यूज

‘देवाभाऊ… माझ्या नणंदेला न्याय द्या’ शिल्पा गवारे हिच्या भावजयीची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

‘देवाभाऊ… माझ्या नणंदेला न्याय द्या’ शिल्पा गवारेच्या भावजयीची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक पिंपरी – सासरच्या छळाला कंटाळून शिल्पा गवारे या ४२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना वाकड येथे गुरुवारी घडली. आपल्या नणंदेला न्याय मिळावा यासाठी शिल्पाची भावजय स्नेहा कलाटे यांनी फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले. “देवाभाऊ… आज रक्षाबंधन आहे. तुम्हाला देवाभाऊ…

Read More

ट्रक-दुचाकीच्या धडकेत वडील-मुलीचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी  

चाकण – औद्योगिक वसाहतीतील शिंदे (ता. खेड) गावाजवळ शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे.  राजेंद्र बंडा भोर (वय-४२) आणि मयुरी राजेंद्र भोर (वय-१५) अशी मृतांची नावे आहेत. तर वैशाली राजेंद्र भोर (वय-३६, तिघे मूळ रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव, सध्या…

Read More

लहान मुलाच्या डोळ्यादेखत तरुणावर चाकूचे सपासप वार, भोर तालुक्यातील थरारक घटना

पुणे- पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा गावात एका तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या थरारक हत्येचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राजगड पोलिसांनी तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. महिला आणि एका लहान मुलासोबत पायी चालत…

Read More

दहशत माजविण्यासाठी देशी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक

पुणे- परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला पर्वती पोलिसांनी अटक केली. अनिकेत बापू कसबे (वय २५, रा. राजीव गांधी नगर, नेर्लेकर हॉस्पिटलजवळ, दांडेकर पूल, पर्वती पायथा, पुणे; सध्या रा. साई सिद्धी चौक, प्रेरणा शाळेजवळ, आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे…

Read More

मिझोरामच्या महिलेकडून साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पुणे रेल्वे स्थानकात झाली कारवाई

पुणे – पुण्यात अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई झाली असून दिल्लीहून पुण्यात आलेल्या मिझोराममधील महिलेकडून तीन कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पुणे रेल्वे स्थानकात केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेकडून (डीआरआय) ही कारवाई करण्यात आली.  लालरे मलियानी (वय ३२, रा. ऐझाॅल, मिझोराम) असे या महिलेचे नाव असून तिला अटक करण्यात आली आहे….

Read More

तो अपघात नव्हे तर खून ; विवाहितेची प्रियकराने ताम्हिणी घाटात नेऊन केली हत्या

पुणे- ताम्हिणी घाटात कोंडेथर गावाच्या हद्दीत मंगळवारी दुपारी एका ३० वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह झुडपात आढळून आला होता. प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे दिसून येत होते. मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. रायगड स्थानिक गुन्हे शाखा आणि माणगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीना जेरबंद केले.  ही…

Read More

शिल्पाची आत्महत्या नसून हत्याच? माहेरच्या मंडळींचा दावा, बेडरूमच्या दरवाजाने संशय बळावला 

पिंपरी – वाकड परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. सासरच्या छळाला कंटाळून तिने आपले जीवन संपवले. मात्र या प्रकरणाला गंभीर वळण लागले असून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा शिल्पाच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. माहेरहून पैसे आणण्यासाठी आणि वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक…

Read More

भरधाव कार ओढ्यात कोसळून पुण्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी अंत, कार्ला फाट्यावर झाला अपघात 

लोणावळा – भरधाव वेगातील कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला जोरात धडकली. यानंतर गाडी थेट रस्त्यालगतच्या ओढ्यात कोसळली. जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (२७ ऑगस्ट) पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या भीषण दुर्घटनेत पुण्यातील दोन तरुणांचा तडफडून मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत ‘सुरज ढाब्या’समोर…

Read More

डिजिटल अरेस्ट असला प्रकार नसतोच, नागरिकांनी सावध राहावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबई – सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने नागरिकांना भीती दाखवून, घाबरवून फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर झाल्यास तातडीने ‘१९३०’ या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘डिजिटल अरेस्ट’ या विषयावरील सायबर…

Read More

श्रावणात दारू पिऊन मांसाहार मागणाऱ्या मुलाचा वडिलांनी केला खून 

पुणे – श्रावणात दारु पिऊन येऊन मांसाहारी जेवण मागितल्याने वडिलांनी रागाच्या भरात मारहाण करुन मुलाचा खून केला. ही घटना वारजे माळवाडी येथे २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा ते पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली. हा प्रकार आईने लपवून ठेवल्याचा प्रकार समोर आल्यामुळे आई वडील दोघांनाही अटक करण्यात आली आहे.  महेश भागवत गायकवाड (वय ३०, रा. रामनगर,…

Read More