ब्रेकिंग न्यूज

अवैध विक्रीसाठी ठेवलेला मद्यसाठा जप्त, पुण्यातील सुर्वेज ढाब्यावर छापा 

अवैध विक्रीसाठी ठेवलेला मद्यसाठा जप्त, पुण्यातील सुर्वेज ढाब्यावर छापा पुणे – पुण्यातील सुप्रसिद्ध सुर्वेज ढाब्यावर बाणेर पोलिसांनी कारवाई करून बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा आरोप असलेला मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी पुण्यातील मालक आणि मॅनेजरला अटक केली आहे. मॅनेजर गोपाल निचळ (वय ४५, रा. भुगाव, पुणे)आणि हॉटेल मालक कुणाल सुधाकर गायकवाड (वय ३९, रा. पिंपळे…

Read More

आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू 

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या पीए यांच्या १२ वर्षाच्या मुलीचा संशयस्पद स्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  प्राथमिक माहितीनुसार रात्री आईचं आणि मुलीचं किरकोळ भांडण झालं, त्यानंतर मुलगी घरातून निघून गेली. मुलगी मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. मात्र सकाळी घराजवळ तिचा मृतदेह आढळला आहे….

Read More

पैंजण विकत घेण्याच्या बहाण्याने आले आणि ७ पैंजण चोरुन नेले, ५ जणांची टोळी जेरबंद

पुणे – चांदीची मोड देऊन पैंजण विकत घेण्यासाठी आलेल्या महिला व पुरुषांनीसराफाची नजर चुकवून ७ पैंजण चोरुन नेले. या प्रकरणी ५ जणांच्या टोळीला लोहगाव पोलिसांनी गजाआड केले आहे. कल्पना अंकुश कांबळे (वय ४७, रा. गोसावी वस्ती, हडपसर), पांडुरंग राम गायकवाड (वय ४२, रा. रुपीनगर, निगडी), दिक्षा वसंत शेलार (वय ३२, रा. रुपीनगर, निगडी), सुमन बाबासाहेब…

Read More

मुंबई – पुणे द्रूतगती मार्गावर भातन बोगद्यात अपघात, बसची चार वाहनांना धडक, १० जण जखमी 

खोपोली – मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील भाताण बोगद्यात ट्रॅव्हल बसने चार वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात होऊन आठ ते दहाजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.   मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून ट्रॅव्हल बस पुण्याच्या दिशेने जात होती. भाताण बोगद्याजवळ बसने पुढे असलेल्या वाहनांना धडक दिली. या अपघातात एक…

Read More

पुण्यात पीएमपीएमएलच्या धडकेत शॉर्टफिल्म दिग्दर्शकाचा मृत्यू

पुणे- पुण्यात एका दुर्दैवी अपघातात एका २१ वर्षीय शॉर्ट फिल्म दिग्दर्शकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटजवळ सोमवारी १७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी घडली. रिद्धेश विनय शिंदे (वय २१, रा. दापोडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रिद्धेश हा एक तरुण आणि उदयोन्मुख लघु चित्रपट दिग्दर्शक होता. त्याने नुकतीच त्याची बीएससी…

Read More

‘आय फोन’ने घेतला एकाच कुटुंबातील तिघांचा जीव, थरारक घटनेने संभाजीनगर हादरले

छत्रपती संभाजीनगर – आयफोनचा हप्ता भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आईवडील आणि मुलाचा दरीमध्ये पडून मृत्यू झाला. ही घटना तिसगाव परिसरातील टेकडीवर शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर हादरून गेले आहे. कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय १९ वर्षे ) मुरलीधर दामोधर चांदगुडे (वय ४८ वर्षे ) संगीता मुरलीधर चांदगुडे (वय ४२ वर्षे )अशी मृतांची नावे आहेत….

Read More

मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्‍या स्पावर छापा, पोलीस पाहताच स्पा मालक दोन महिलांसह पळाला

पुणे- मसाजच्या नावाखाली स्पामध्ये वेश्या व्यवसाय करणार्‍या हडपसर येथील ‘सेव्हन स्पा’वर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. मात्र पोलिसांना पाहताच स्पाचा चालक व मॅनेजरने थेथून धूम ठोकली. स्पाचालक कपिल ऊर्फ काफिल उद्दीन आणि स्पा मॅनेजर असिफ यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हडपसरमधील डी पी रोडवर ‘सेवन स्पा’ असून त्याठिकाणी स्पाचालक कपिल…

Read More

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनीता खरातचे व्हाट्सअप अकाउंट हॅक, घडला मोठा स्कॅम

मुंबई- सध्या सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवताना दिसतात. ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लुबाडण्याचा प्रकार घडतो. पण या सायबर गुन्हेगाराच्या तावडीतून सेलिब्रिटी देखील सुटले नाहीत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनीता खरात सोबत असाच प्रकार घडला. डिलिव्हरी बॉयला पत्ता सापडत नाही, असा कॉल करून एका व्यक्तीने वनीता खरातचे व्हाट्सअप अकाउंट हॅक करून अनेकांकडून तब्बल ६२ हजार…

Read More

तृतीयपंथीय असल्याचे भासवून घरात घुसून महिलेवर अत्याचार, अवघ्या काही तासांत आरोपीला अटक

मुंबई- साडी नेसून तृतीयपंथी असल्याचं भासवून एका तरुणाने पवई परिसरात एका घरात घुसून महिलेसोबत अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली. आजारी पतीला बरे करण्याच्या आणि घरावरची वाईट नजर उतरवण्याच्या बहाण्याने तो घरात घुसला. महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपीला अवघ्या काही तासात जेरबंद केले. अनिल शिंदे (30) असे या आरोपीचे नाव आहे….

Read More

दारूने केली गोची ! पत्नीला पोटगी देण्यास नकार देणाऱ्या पतीचे बिंग फुटले

पुणे- ‘मद्य खरेदी करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीकडे लक्षणीय उत्पन्न असते,’ असे निरीक्षण नोंदवून पुणे न्यायालयाने पतीला पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा नऊ हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश दिला. कौटुंबिक वादातून उद्भवलेल्या एका प्रकरणात पत्नीने पतीविरोधात घटस्फोटाचा दावा पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात दाखल केला होता. या दांपत्याचा २०१३ मध्ये विवाह झाला. कौटुंबिक वादातून शारीरिक-मानसिक…

Read More