चिंचवडमध्ये बुधवारी रंगणार ‘मोगरा फुलला’ भक्तिमय संगीत सोहळा
पिंपरी- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५०व्या जन्मवर्षाचे औचित्य साधून संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने भक्तिरसपूर्ण ‘मोगरा फुलला’ या विशेष संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात हा भक्तिमय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा…
