आमदार अण्णा बनसोडे व नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांच्या सौजन्याने रंगली दिवाळी पहाट

आमदार अण्णा बनसोडे व नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांच्या सौजन्याने रंगली दिवाळी पहाट
Share

पिंपरी- महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे आणि प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक सिद्धार्थ अण्णासाहेब बनसोडे यांच्या सौजन्याने अखिल पिंपरी-चिंचवड कलामंचच्या वतीने दिवाळी पहाट, सांस्कृतिक कार्यक्रम व फराळ वाटपाचे आयोजन रविवारी (दि.८) करण्यात आले होते.

या कार्यक्रमात प्रथमच शहरातील स्थानिक कलाकारांनी एकत्र येत विविध कलांचे सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्राची लोकधारा, अभंग, भक्तिगीते, भावगीते, हिंदी व मराठी गाणी, लावणी, लोकगीते आणि काव्यरचना अशा विविध कलाप्रकारांतून महाराष्ट्राच्या समृद्ध कला-संस्कृतीचे दर्शन घडले.

या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि सिद्धार्थ बनसोडे यांच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील कलाकारांसाठी दिवाळी पहाट, सांस्कृतिक कार्यक्रम व फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुज्जफर इनामदार पत्रकार, चंद्रकांत पवार आंतरराष्ट्रीय गायक, राजेंद्र जगताप (राष्ट्रवादी नेते), सूर्यकांत पवार चित्रपट निर्माते आणि पुरुषोत्तम हिंगणकर महाराज कीर्तनकार हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. या कार्यक्रमामध्ये स्थानिक कलाकारांनी गायन, वादन, लावणी आणि महाराष्ट्राची समृद्ध लोकधारा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्या गायकवाड नढे, गायत्री साळवे, अशोक टाकळे, मनीषा इंगोले, जगन्नाथ खाडे, शेखर चांदणे, अमित देशमाने, प्रतीक सत्वाधीर, रेखा दुसाने, कोमल भोसले, सागर डाडर, संतोष माहेश्वरी, प्रमोद कुलकर्णी, सविता कोरडे, कविता तळेकर, मनीषा सपकाळे, सुरेखा कुलाल यांनी आपल्या सुमधुर गायनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीचे सुंदर दर्शन या कार्यक्रमातून घडले.

Vedh News