प्रभाग ८ मधील सफाई कर्मचाऱ्यांचा फराळ व साडी वाटप करून केला सन्मान

प्रभाग ८ मधील सफाई कर्मचाऱ्यांचा फराळ व साडी वाटप करून केला सन्मान 
Share

पिंपरी- दिवाळी हा आनंद वाटण्याचा सण आहे, या भावनेतून आज शुक्रवारी (दि.६) प्रभाग ८ मधील श्री हनुमान मंदिर येथे प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळ व साडी वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

आपला परिसर रात्रंदिवस स्वच्छ ठेवण्यासाठी झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या दिवाळीतही आनंद भरावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले तसेच महिला कर्मचाऱ्यांना साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. साडी व फराळ मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थित सर्वांचेच मन भारावून गेले.

या कार्यक्रमाला संतनगर मित्र मंडळ व भूगोल फौंडेशनचे विठ्ठल नाना वाळुंज, ह भ प सतीश महाराज गव्हाणे, अनिल जगताप, भारत सरडे, अनिल घाडगे, सीताराम वाळुंज, अशोक पोटे, राजेंद्र ठाकूर, यादवराव जाधव, धर्मासिंग पाटील, शशीकांत वाडते तसेच आरोग्य विभागाचे सुपरवायझर बांगर साहेब व इतर अन्य प्रभागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी सफाई कर्मचाऱ्यांचे आभार मानत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

“परिसर स्वच्छ ठेवणारे हेच खरे दिवाळीचे लक्ष्मीचे रूप आहेत. त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे” अशी भावना यावेळी ह भ प सतीश महाराज गव्हाणे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आयोजकांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

Vedh News