ब्रेकिंग न्यूज

विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी येणार, कार्यक्रमाची तारीख ठरली

बारामती- “विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या वास्तूमध्ये गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासह समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडवणारे प्रेरणास्थान उभारण्यात येणार आहे. या वास्तूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्याचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. विद्या प्रतिष्ठानच्या स्थापना दिनानिमित्त १६ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे….

Read More

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंस्धेला रंगली देशभक्तीपर गीतांची मैफिल

पुणे- भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंस्धेला ‘आपला म्युझिकल ग्रुप’च्या वतीने देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात अनिल घाडगे, रणजित पाटील, भूषण देवधर, शशिकांत वाडते, विजय कांबळे, उमा मेनन, विद्या हजारे पाटील, भारती सातव, छाया अय्यर, स्नेहलता चव्हाण, सुषमा वनारसे यांनी कराओकेच्या साथीने सुरेल आवाजात गाणी सादर…

Read More

‘एफडीए’ची पुण्यात सर्वात मोठी कारवाई, बर्गर किंग आणि झेप्टोचा अन्न परवाना रद्द

पुणे -अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी अस्वच्छता, भेसळ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट्सवर कठोर कारवाईची विशेष मोहीम राबवत एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या तावडीतून राज्यातील पंचतारांकित हॉटेल्स, नामांकित रेस्टॉरंट्स, पब्स तसेच फूड डिलिव्हरी ॲप्सच्या स्टोअर्स कुणीही सुटले नाहीत. आता पुण्यात तुकाराम मुंढे यांच्या पथकाने आतापर्यंतची सर्वात मोठी…

Read More

लायन्स क्लब भोजापूर गोल्डतर्फे ब्रेस्टफीडिंग वीकनिमित्त जनजागृती

भोसरी – ब्रेस्टफीडिंग वीक जगभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो. लायन्स क्लब भोजापूर गोल्डतर्फे जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  क्लबमध्ये नव्याने सहभागी झालेले डॉक्टर नेहा विखणकर यांनी स्तनपानाचे महत्त्व, नवजात अर्भकाच्या आरोग्यासाठी त्याचे फायदे तसेच माता आणि बाळाच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये विविध हॉस्पिटलमधील ४० नर्सेस आणि स्टाफ…

Read More

ओम प्रतिष्ठानच्या विद्यादान योजनेत दहा मुलींचे स्वीकारले शैक्षणिक पालकत्व

पिंपरी- आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत मुलींचे उच्च शिक्षण थांबू नये, यासाठी ओम प्रतिष्ठान विद्यादान योजनेने यावर्षी २०० मुलींच्या शिक्षणाला मदत करण्याचा संकल्प केला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दहा मुलींची निवड करून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत पोहोचविण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रीती नारायण यांनी कार्तिक सरांच्या सहकार्याने दहा मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत त्यांच्या उच्च शिक्षणासाठी…

Read More

करिअरमध्ये जबाबदारी आणि कर्तव्याचे भान ठेवा – वसंत नामा गवळी

पिंपरी- सोशल मीडियाच्या आभासी जगतामध्ये वावरताना, आपले करिअर घडत असताना नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य देखील पार पाडण्याचे भान विद्यार्थ्यांनी ठेवावे. लिंगायत गवळी समाजातील तरुणाईचा उपयोग सक्षम, सुदृढ, सुसंस्कृत समाज उभारणीसाठी झाला पाहिजे. उच्च शिक्षण घेऊन पुढे गेलेल्या तरुणांनी आपल्या मागच्या पिढीला मार्ग दाखविला पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष वसंत नामा…

Read More

दिवंगत विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त खडकी पोलीस स्टेशनला संगणकीय साहित्याचे वितरण

पुणे- दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशन व शिवसंकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीने खडकी पोलीस स्टेशनला समाजोपयोगी उपक्रमांतर्गत लॅपटॉप, संगणक, टॅबलेट, प्रिंटर आदी संगणकीय साहित्याचे वितरण करण्यात आले. पोलीस प्रशासनाचे दैनंदिन कामकाज अधिक अद्ययावत, गतिमान आणि तंत्रज्ञानस्नेही होण्यासाठी आवश्यक असलेले हे संगणकीय साहित्य खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. विक्रमसिंह कदम यांच्याकडे सुपूर्द…

Read More

लायन्स क्लब पुणे भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी डॉ. सौम्या साबळे

भोसरी – समाजसेवेची दोन दशकांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या लायन्स क्लब पुणे भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी डॉ. सौम्या साबळे यांची नियुक्ती झाली आहे. लायन्स क्लब पुणे भोजापूर गोल्डने २० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून २१ व्या सेवा वर्षात दिमाखदार प्रवेश केला आहे. या क्लबच्या माध्यमातून भोसरी–पिंपरी-चिंचवड परिसरात सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवला जात आहे. यंदाच्या सेवा वर्षासाठी चार्टर…

Read More

अपयशाची भीती बाळगू नका, सकारात्मक विचार करा- सिध्दार्थ जाधव

पिंपरी- जीवनात कधीही न्यूनगंड आणि अपयशाची भीती बाळगू नका. नेहमी प्रयत्नशील रहा, धाडसी बना. कोणतीही कृती पूर्ण क्षमतेने, समर्पण भावनेने आणि सकारात्मक विचाराने केल्यास नक्कीच यश मिळेल, असा सल्ला सुप्रसिध्द मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याने तरूणाईला दिला. चिंचवड येथे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि दिशा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिद्धार्थ जाधवशी दिलखुलास गप्पा’ या…

Read More

एआयचा फुगा आज ना उद्या फुटणार – डॉ अच्युत गोडबोले

पुणे(प्रतिनिधी) कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय ) सर्व कामे सहज,अचूक आणि त्वरित होतात. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे खूप जलद गतीने क्रांती घडत आहे त्यामुळे सर्व क्षेत्रावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे .कोट्यावधी नागरिक बेरोजगार होणार आहे, त्यांच्या हातातील आत्ताची कामे जवळपास नाहीशी होणार आहेत. जरी हा ए आयचा फुगा आज ना उद्या फुटणार असला, तरी त्याचे सर्वगामी परिणाम संपूर्ण…

Read More