ब्रेकिंग न्यूज

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

पिंपरी, पुणे – साहित्य चळवळीला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळावे, वाचनसंस्कृती बळकट व्हावी आणि नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम प्रभावीपणे व्हावे, यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ आगामी काळात ठोस आणि कृतीशील कार्यक्रम राबविणार असल्याचे ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण यांनी सांगितले. पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण, प्रमुख…

Read More

उद्योजक हे राष्ट्राचे भाग्यविधाते! – पद्मश्री गिरीश प्रभुणे

पिंपरी – ‘यशस्वी उद्योजक हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर राष्ट्राचे भाग्यविधाते आहेत!’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी काढले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे या संस्थेच्या वतीने भारतरत्न जे आर डी टाटा आणि उद्योगमहर्षी रतन टाटा पुरस्कार प्रदान सोहळ्यात गिरीश प्रभुणे बोलत होते. आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर अध्यक्षस्थानी होते; तसेच महाराष्ट्र…

Read More

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे लोकार्पण संपन्न

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराच्या न्यायालयीन इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक व अभिमानास्पद ठरला. शहराला दीर्घ प्रतीक्षेनंतर स्वतःचे हक्काचे “जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय” मोरवाडी येथील जुनी न्यायालयीन इमारत येथे अत्यंत सन्माननीय वातावरणात व मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते झाडाच्या रोपाला पाणी घालून करण्यात आली. या न्यायालयाचे लोकार्पण मुंबई उच्च न्यायालयाचे…

Read More

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय महामेळावा संपन्न

पुणे : अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय भव्य वधू-वर व पालक परिचय महामेळावा २०२६ हा कार्यक्रम रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महामेळाव्यास महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून समाजबांधव, पालक, युवक-युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज…

Read More

सुर्वे यांचे जीवन म्हणजे वेदनेचा प्रवास! – डाॅ. श्रीपाल सबनीस

पिंपरी- ‘नारायण सुर्वे यांचे जीवन म्हणजे वेदनेचा प्रवास होय! जिल्हा परिषदेच्या शाळेला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून देणारे दत्तात्रय वारे हे सर्वार्थाने आदर्श शिक्षक आहेत; परंतु सरकार संवेदनशीलता विसरली होती!’ अशी खंत ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी  व्यक्त केली. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित एकदिवसीय पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर…

Read More

राजमाता जिजाऊ आईसाहेबांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे – इरफानभाई सय्यद

चिंचवड :स्वराज्याच्या संकल्पनेला आकार देणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान योद्ध्याला घडविणाऱ्या स्वराज संकल्पक राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची जयंती शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष इरफानभाई सय्यद, संघटनेचे खजिनदार नागेश…

Read More

पिंपरी चिंचवडच्या वैभवाला शब्दांच कोंदण – वर्षा उसगावकर

पिंपरी- पिंपरी चिंचवड वैभव काव्यसंग्रहा मधून शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक प्रतिभेची सर्वांना माहिती, ओळख होते. या काव्य संग्रहाने शहराविषयी शब्दांचे कोंदण निर्माण केले आहे. या माध्यमातून स्थानिक साहित्यिकांशी संभाजी बारणे यांनी योग्य समन्वय साधून व्यासपीठ उपलब्ध केले; ही विशेष कौतुकाची बाब आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड…

Read More

साहित्य निर्मितीची प्रेरणा शाळेतूनच कादंबरीकार विश्वास पाटील

  भोसरी वेध न्यूज – साहित्याची प्रेरणा जिल्हा परिषदेच्या शाळेत असतानाच गुरुजनांमुळे झाली. मराठी साहित्यात विपुल लेखन करत असतानाच माझी लेखणी शिवरायांच्या पावला जवळ येऊन थांबली आणि निर्माण झाली महाकादंबरींची मालिका. मराठी साहित्य टिकवायचे असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी भोसरी…

Read More

राज्याच्या युवा धोरण समितीत सनी विनायक निम्हण यांची नियुक्ती

पुणे :-महाराष्ट्र शासनाने राज्यासाठी सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून पुण्यातील युवक कार्यकर्ते सनी विनायक निम्हण यांची निवड करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप पत्रकार विनोद राऊत आणि पत्रकार भगवान परब यांचाही या समितीत…

Read More

इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सीमा काळभोर यांची निवड महिलांना प्रेरणादायी – अरुण बोऱ्हाडे

पिंपरी- पवित्र इंद्रायणी नदीच्या काठावर, तीर्थक्षेत्र आळंदी व देहू च्या कुशीत वसलेल्या आणि श्री नागेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोशी गावात अहिल्याबाई होळकर साहित्य नगरी येथे चौथे एक दिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलन रविवारी (दि.२३ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान उच्चशिक्षित डॉ. सीमा सागर काळभोर यांना देण्यात आला आहे. डॉ. सीमा…

Read More