नटसम्राटाची एक्झिट ! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

पुणे- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील डोणजे गावातील त्यांच्या फार्महाऊसवर (नानाची वाडी) काल, गुरुवारी रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या लाडक्या अभिनेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी रसिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती.
गुरुवारी सकाळी नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी धडकताच संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यांना तातडीने येथील मनिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी ४५ मिनिटांहून अधिक वेळ त्यांना वाचवण्याचा (CPR) आटोकाट प्रयत्न केला; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे पार्थिव गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. ‘मेडिको-लीगल केस’ (MLC) नोंदवण्यात आल्यामुळे नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले.
शवविच्छेदन झाल्यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास गोव्याहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव पुण्यात त्यांच्या डोणजे येथील निवासस्थानी आणण्यात आले. तत्पूर्वी पुणे विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी कळताच डोणजे गावावर शोककळा पसरली. नाना पाटेकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “आपल्या सर्वांना शेवटी जाण्यासाठी १२ मण लाकूड लागणार आहे. तीच माझी अंतिम मालमत्ता असेल. मी माझ्यासाठी १२ मण सुकी लाकडे गोळा करून आधीच बाजूला ठेवली आहेत.” त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या शेतजमिनीवर, त्यांनी स्वतः गोळा करून ठेवलेल्या याच सुक्या लाकडांचा वापर करून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.
यावेळी खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार भाई जगताप, हेमंत पाटील, अनिकेत तटकरे, गोपीचंद पडळकर, अमित गोरखे, भीमराव तापकीर, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, महापौर मंजुषा नागपुरे, सभापती युवराज काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
#WATCH | Maharashtra: Last rites of veteran actor Nana Patekar performed with state honours at his native village, Donje village in Pune Rural. He passed away in Goa today. https://t.co/sh2DtLvT4g
— ANI (@ANI) October 8, 2026






