ब्रेकिंग न्यूज

Vedh News

औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द, फेरपरीक्षा घेण्याचा लोकसेवा आयोगाचा निर्णय 

मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अन्न व औषध प्रशासन- औषध निरीक्षक, गट ब,भरती प्रक्रिया रद्द केली आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्राथमिक निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने काढला आहे. त्यामुळे आता फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. २२ मार्च २६ रोजी ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने राज्यातील ६ विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर…

Read More

हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचे उदघाट्न पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार! पण कधी?

पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. हिंजवडी मेट्रो कधी सुरु होणार हा प्रश्न पुणेकरांकडून सातत्याने विचारला जात होता. या मार्गाची चाचणी देखील करण्यात आली होती. दिरंगाईमुळे या मेट्रोचे मिम्स बनवले गेले. पण मेट्रो कधी सुरु होणार याबाबत ठोस माहिती…

Read More

त्याच्याबरोबर दारू प्यायला बसली, वाद झाला आणि तिने उचलला दगड… 

पुणे – दारू पिऊन झालेल्या वादातून एका महिलेने दगडाने डोक्यात व छातीत मारून एकाची निर्घृण हत्या केली. ही घटना रविवारी सात वाजण्याच्या सुमारास कासारसाई- कूसगाव रस्त्यावरील कृष्ण मंदिरापुढील वन विभागाच्या जागेत घडली. हनुमंत सोपान शितोळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी मयूर शितोळे (३०, कासारसाई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जयवंता भगवंत तिडके…

Read More

आंतरराज्य ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, 30 लाखांच्या ड्रग्जसह माजी एअरहोस्टेस सह एकाला अटक

मुंबई- गुजरातच्या वडोदरा येथून मुंबईत ड्रग्ज तस्करी करणाऱ्या मलेशियन एअरलाईन्सच्या माजी एअरहोस्टेसला तिच्या साथीदारासह सूरत क्राईम ब्रँचने अटक केली आहे. वडोदराहून एका कारमधून मोठ्या प्रमाणावर ‘एमडी’ ड्रग्ज मुंबईला नेले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. मानसी सय्यद (वय ४१) आणि सोहेल सुलेमान शेख (वय २०) अशी…

Read More

पुण्यातील विषारी गावठी दारू प्रकरणात आणखी दोघांना अटक

पुणे- विषारी गावठी दारू प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष मकोका न्यायालयाने त्यांना एक सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, सखोल तपासासाठी आरोपींची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. आर्यन संजीव धोत्रे (वय २४) आणि कल्पेश अशोक अग्रवाल (वय २९) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत हडपसर पोलीस…

Read More

राहुल गांधी पुन्हा पुणे दौऱ्यावर ? मांजरी येथील आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेणार ?

पुणे- लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असून ते मांजरी येथे आदिवासी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणस्थळी भेट देऊन या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत अशी माहिती काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत भुरिया यांनी दिली आहे. पुण्यात झालेल्या ‘छात्रों क गूंज’ कार्यक्रमात निशा साबळे या विद्यार्थिनीने लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्यासमोर…

Read More

वाकडमध्ये ट्रॅव्हल्स कार्यालयात घुसून तोडफोड; महिन्याला ५० हजारांच्या हप्त्याची मागणी

वाकड – येथील भुजबळ चौक परिसरात डॉलफिन ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात घुसून एका तरुणाने कार्यालयातील सामानाची तोडफोड करून कार्यालय चालवायचे असेल तर दर महिन्याला ५० हजार रुपये हप्त्याची मागणी केली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कार्तिक हनुमंत बारवे (वय २३, रा. सोळा नंबर कॉलनी क्रमांक १, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार…

Read More

सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार

पुणे- सूस-नांदे परिसरातील वाढती वाहतूक आणि नागरिकांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलिस प्रशासन आणि सनीज वर्ल्ड यांच्या वतीने संयुक्तपणे पुढाकार घेण्यात आला आहे. एसीपी सत्यजीत आदमाने आणि वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राकेश गुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकाराने सनीज…

Read More

चिंचवडमध्ये बुधवारी रंगणार ‘मोगरा फुलला’ भक्तिमय संगीत सोहळा

पिंपरी- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५०व्या जन्मवर्षाचे औचित्य साधून संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने भक्तिरसपूर्ण ‘मोगरा फुलला’ या विशेष संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात हा भक्तिमय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा…

Read More

‘ती’ आईशी भांडून घराबाहेर गेली आणि….रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या मृत्यूचे कारण आले समोर… 

बारामती – आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. या प्रकरणाच्या तपासाची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार आणि बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी…

Read More