ब्रेकिंग न्यूज

अजित गव्हाणे यांच्या विजयासाठी भोसरीत एकवटला ‘परिवर्तनाचा जनसागर’

Share

भोसरी (वेध न्यूज) भोसरी गावठाणा मध्ये काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने भोसरीकर एकवटले. “यंदा खेळ बदलणार आणि एकी हेच बळ “अशा घोषणांनी भोसरीकरांनी निवडणुकीच्या प्रचाराचे लक्ष वेधले. प्रचंड जनसमुदा सोबत एकवटलेल्या भोसरीकरांमुळे विधानसभा निवडणुकीत अजित गव्हाणे यांनी रंग भरला आहे.

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना नुकतेच फुगे कुटुंबीयांकडून बळ मिळाली . याची परिणीती गव्हाणे यांच्या प्रचारानिमित्त काढलेल्या रॅलीमध्ये दिसून आली. भोसरी गावठाणा मध्ये काढलेल्या रॅलीमध्ये माजी नगरसेविका भीमाबाई फुगे, सम्राट फुगे यांनी पुढाकार घेतला. रॅलीमध्ये अजित गव्हाणे यांना गावठाणातील युवा कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ दिसून आले. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

यावेळी गव्हाणे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. नागरिकांच्या गाठीभेटी घेत असताना महिला भगिनींनी औक्षण करत गव्हाणे यांना ‘विजयाचा तिलक’ लावला. युवा कार्यकर्त्यांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहत गव्हाणे यांना विजयाचा विश्वास दिला.

लक्षवेधक घोषणा

भोसरी गावठाणामधून प्रचार रॅली जात असताना “तुम्ही खेळ सुरू केला असला तरी आम्हाला खेळ बदलता येतो”अशा घोषणांनी लक्ष वेधून घेतले. एकी हेच बळ असे म्हणत तमाम भोसरीकरांनी परिवर्तनाचा नारा दिला. गव्हाणे यांना मिळत असलेला युवकांचा पाठिंबा परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहे.

ज्येष्ठांचे आशीर्वाद, युवकांची साथ आणि माय माऊलींचा पाठिंबा या बळावर आता भोसरीकरांच्या साक्षीने परिवर्तन अटळ आहे. दहा वर्षातील खदखद बाहेर पडत असून या परिवर्तनाचा मी केवळ एक चेहरा आहे. ही माझी प्रांजळ कबुली आहे. भोसरीकर ठरवतात ते नक्की करतात हा इतिहास आहे. अशी भावना अजित गव्हाणे यांनी व्यक्त केली.