ब्रेकिंग न्यूज

अभिनय बेर्डेचा अभिनय क्षेत्रातून ब्रेक ? व्हिडिओ शेअर करुन काय म्हणाला अभिनय ?

Share

‘ती सध्या काय करते’,’मन कस्तुरी रे’, ‘Boyz 4’, ‘दशावतार’ आणि ‘उत्तर’ सारख्या गाजलेल्या सिनेमातून आपल्या अभिनयाचे प्रदर्शन करणाऱ्या अभिनय बेर्डे याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनय क्षेत्रातून थोड्या काळासाठी बाजूला व्हायचे आहे असे तो म्हणतोय. त्याचे कारण देखील त्याने सांगितले आहे.

मराठी सिनेसृष्टीचे दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभिनय बेर्डे (Abhinay Berde) यानंही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी सिनेसृष्टीत दणक्यात पदार्पण केले. प्रेक्षकांनी देखील त्याच्यावर भरभरून प्रेम केले. पण आता अभिनय बेर्डेने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले आहे.

याबाबत इंस्टाग्राम वर एक छोटासा व्हिडिओ शेअर करून तो म्हणतोय की ‘मी एक स्टार्टअप सुरु करण्याच्या विचारात आहे.त्यासाठी मला काही नव्या संकल्पना हव्या आहेत. त्यामुळे मला तुमची मदत लागणार आहे. जर, तुमच्याकडे Out Of The Box काही क्रेझी संकल्पना असतील तर, कमेंट्समध्ये मला नक्की कळवा…”

अभिनय बेर्डेनं शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांना अभिनयनं अचानक घेतलेला हा निर्णय ऐकून फारच धक्का बसलाय. तर, अनेकांनी त्याला त्याच्या स्टार्टअपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पण, अभिनयच्या व्हिडीओवर त्याची बहीण स्वानंदी बेर्डेनं “ब्रो फक्त माझ्यामध्ये गुंतवणूक कर..” असा सल्ला दिलाय.

काय म्हणाला अभिनय बेर्डे हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/reel/Dc5_8mSA3A7/?stkn=MW1qbnpleG4xa2kxZQ==