पिंपरी- मला शिस्त लागावी वडिलांनी मला चिंचवडला पाठवले. रंगमंचावर पहिले पाऊल ठेवले ते चिंचवडच्या संघवी केशरी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये. या शहराचे वातावरण मोकळे ढाकळे, मी मुंबईतून आलेला असलो तरीही व्यायामाची आवड असल्यामुळे मी या वातावरणात मिसळून गेलो. या मातीने मला प्रचंड आत्मविश्वास दिला. माझे सगळे मित्र गावडे, चिंचवडे लांडे, लांडगे होते. यामध्ये दामले पूर्णपणे मिसळून गेले अशी मिश्किल टिपण्णी अभिनेते प्रशांत दामले यांनी केली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात तीन दिवसीय ‘पिंपरी चिंचवड महोत्सव’ला सुरूवात झाली. या महोत्सवाचे उदघाटन प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला विधानपरिषद सदस्या उमा खापरे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, तसेच महोत्सवाचे संयोजक व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे आणि अमित गोरखे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात तीन दिवसीय ‘पिंपरी चिंचवड महोत्सव’चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचा आज (दि.२०) शेवटचा दिवस आहे. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात कला, संगीत, नाट्य आणि खवय्यांसाठी खाद्यसंस्कृतीची मोठी पर्वणी पाहायला मिळाली. या महोत्सवात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा ‘कलारत्न’, ‘साहित्यरत्न’, ‘नृत्यरत्न’ यांसारख्या विविध रत्न पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
प्रशांत दामले यांचे पूर्ण भाषण ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
